हवेली तालुक्याला संधी मिळावी- महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर

1768

महेश फलटणकर, लोणी काळभोर,

शहराजवळ असणारा पूर्व हवेली तालुका शैक्षणिक,आर्थिक,औद्योगिक क्षेत्रात अग्रेसर असून देखील मात्र हवेली तालुक्याला राजकीयदृष्ट्या सक्षम नेतृत्व असताना हि हवेली तालुक्याचा विचार होत नसल्याची खंत महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर यांनी व्यक्त केली.
लोणी काळभोर येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती हवेली यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या १ कोटी ३२ लाख रुपयांच्या विविध विकास कामांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.यावेळी जिल्हा परिषद सदस्या सुनंदा भालेराव,पंचायत समिती सदस्य सन्नी काळभोर,जेष्ठ नेते माधव काळभोर,माजी जिल्हा परिषद सदस्य विलास काळभोर,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिलीप काळभोर,सुभाष काळभोर,उपसरपंच सीमा काळभोर, ग्रा.प सदस्य अण्णासाहेब काळभोर,राजाराम काळभोर,राजेंद्र काळभोर,अनिता काळभोर,सविता लांडगे आदि मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी बोलताना काळभोर म्हणाले कि पूर्व हवेली तालुक्यात राजकीय क्षेत्रात मातब्बर मंडळी असून देखील फक्त स्थानिक स्वराज्य संस्थेपुर्ती मर्यादित असल्याचे दिसून येत आहेत.तालुक्याची लोकसंख्या पाहता गावाचे शहरीकरण होत आहे. शैक्षणिक,आर्थिक,औद्योगिक क्षेत्रात विकसित होत आहे. राजकीय क्षेत्रात हवेलीकरांना योग्य संधी मिळाली तर साहजिकच तालुकाचा सर्वागीण विकास होईल अशी भावना त्यांनी वेळी व्यक्त केली.