Homeताज्या घडामोडीजिल्हाधिकारी कार्यालयाकडून 3 लाख ट्रिपल लेअर सर्जिकल मास्कची खरेदी; जिल्हाधिकारी नवल किशोर...

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून 3 लाख ट्रिपल लेअर सर्जिकल मास्कची खरेदी; जिल्हाधिकारी नवल किशोर राम

पुणे प्रतिनिधी,

कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने तीन लाख ट्रिपल लेअर सर्जिकल अल्ट्रासोनिक मास्क खरेदी करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली आहे.

पुणे पोलीस आयुक्त कार्यालयासाठी दहा हजार मास्क, तर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयासाठी सात हजार मास्क तसेच पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण कार्यालयाला दहा हजार मास्क वितरीत करण्यात येणार आहेत. याबरोबरच सर्व तहसिलदार कार्यालयांना प्रत्येकी एक हजार प्रमाणे पंधरा हजार मास्क वितरीत करण्यात येणार आहेत.

पहिल्या टप्यात एकुण 42 हजार मास्क वितरीत करण्यात येत आहेत. उर्वरित मास्क टप्याटप्याने सर्व संबंधित यंत्रणांना वितरीत करण्यात येतील, असेही जिल्हाधिकारी श्री. राम यांनी सांगितले.

0000000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments