योगासनाने रोगप्रतिकारशक्ती वाढवून करू कोरोनावर मात ; मंजीत नवले

1409

मल्हार न्यूज,प्रतिनिधी,
सध्या कोरोना व्हायरसचा धोका कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जात असताना सगळ्यात महत्वाची आणि मूलभूत अशी गोष्ट आहे ती म्हणजे रोगप्रतिकारशक्ती. रोगप्रतिकारशक्ती चांगली असेल तर कोरोनाच नाही तर कोणत्याही आजारापासून सुटका मिळवता येऊ शकते. केमिकल्स किंवा इतर घटकांचा समावेश न करता घरच्याघरी काही पदार्थांचा समावेश आहारात करून तुम्ही आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवू शकता. फक्त आहार नाही तर वेगवेगळे व्यायाम, योगासने करून सुद्धा इन्फेक्शनला स्वतः पासून दूर ठेवू शकता, असे योग प्रशिक्षक मंजीत नवले यांनी सांगितले.

           कोरोना व्हायरसचा परिणाम शरीरातील अवयांवर होतो.त्यामुळे फुफुसांचे, मेंदूचे, ह्रदयाचे कार्य सुरळीत होत नाही. सतत रक्तवाहिन्यांमध्ये सुद्धा व्हायरसचा प्रसार झालयामुळे रक्तपुरवठा व्यवस्थित होत नाही. यावर एकच उपाय म्हणजे विविध प्रकारची विविध योगासने . नियमित योगासने केल्यामुळे आपण काही प्रमाणात कोरोना वर मात करू शकतो असेही योग प्रशिक्षक मंजीत नवले यावेळी म्हणाले. मंजीत नवले यांंनी सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी येथिल श्री शारदेय गुरूकुल पब्लिक स्कूल च्या माध्यमातून योग प्रसाराचा हा उपक्रम सुरू केला असून संपूर्ण जिल्ह्यातील शाळा तसेच नागरिकांना त्यांच्या ह्या उपक्रमाचा फायदा होणार आहे.

    आपणही या समाजाचे काही देणे लागतो याच एका भावनेतून ते रोज नवनवीन प्रकारचे योगासनांचे व्हिडीओ प्रसारित करून सर्वसामान्य जनतेला, विध्यार्थ्याना मोफत देत असून प्रत्येक नागरिकांनी हि योगासने घरी नियमित करून रोगमुक्त तसेच कोरोना मुक्त राहावे. योगामुळे रोगप्रतिकार क्षमता विकसित होते, श्वसनक्षमता वाढते,योगचे शारीरिक मानसिक फायदे आहेत, नियमित योगासनांनी विविध आजार बरे होतात. लॉकडाऊनच्या काळाचा चांगला सदपयोग करून नागिरकांनी योगासने करून रोगप्रतिकारशक्ती वाढवून कोरोनावर मात केली जाईल असेही नवले याप्रसंगी म्हणाले.