Homeपश्चिम-महाराष्ट्रपुणेश्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख पदी योगेश देसाई

श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख पदी योगेश देसाई

अर्जुन मेदनकर,आळंदी

श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटी आळंदीचे विश्वस्त श्री योगेश देसाई यांची श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुखपदी एकमताने निवड करण्यात आली आहे. अशी माहीती संस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी दिली.
या संदर्भात आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त अँड विकास ढगे पाटील यांचे अध्यक्षते खाली विश्वस्त मंडळाची बैठक आळंदी भक्त निवासात झाली. यावेळी प्रमुख विश्वस्त अँड विकास ढगे पाटील,विश्वस्त डाॅ.अभय टिळक, अजित कुलकर्णी, योगेश देसाई , व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर उपस्थित होते.यावर्षी श्रींचे पालखी सोहळ्यावर कोरोनाच्या संकटाचे सावट आहे. यामुळे सोहळ्याचे नियोजन व स्वरुप ठरविण्याची मोठी जबाबदारी विश्वस्त मंडळावर आली आहे,शासन,देवस्थान कमेटी व सोहळ्याचे संबंधित घटक सुसंवाद साधुन तयारी करीत आहेत.पालखी सोहळा प्रमुख पदी देसाई यांचे निवडीचे आळंदी परीसरात स्वागत करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

conchybason1979 on Home