Thursday, March 20, 2025
Google search engine
Homeपश्चिम-महाराष्ट्रपुणेअयोध्याच्या श्री राम मंदिराला बेंजर पेंट्स रंगीत रंग देणार ; प्रदीप अग्रवाल

अयोध्याच्या श्री राम मंदिराला बेंजर पेंट्स रंगीत रंग देणार ; प्रदीप अग्रवाल

सर्व प्रमुख धार्मिक स्थळांना कमी दरात पेंट दिले जाणार

पुणे, महाराष्ट्र : देशातील नामांकित बेंजर पेंट्सचे संचालक प्रदीप अग्रवाल यांनी अयोध्येत उभारल्या जाणार्या देशाचे भव्य आणि सन्मान असलेले भगवान श्री रामांच्या मंदिराला आपले योगदान म्हणून उत्कृष्ट प्रतीचे पेंट देण्याचे ठरविले आहे. या संदर्भात अधिक माहिती देताना नेहमीच सामाजिक कार्यासाठी अग्रगण्य असलेले प्रदीप अग्रवाल म्हणाले की, आपल्या सर्वांच्या अंतःकरणात असणारे मर्यादा पुरूषोत्तम भगवान श्रीरामांच्या नव्याने बांधले जाणार्या भव्य आणि विशाल मंदिराला सर्वोत्कृष्ट दर्जेदार पेंट लावावे. अग्रवाल यांनी देशातील सर्व प्रमुख धार्मिक स्थळांना एक ही पैसा न कमवता न नफा न नुकसान या तत्वावर उत्कृष्ट व सर्वोत्तम दर्जाचे पेंट देण्याचे ठरविले आहे. उल्लेखनीय आहे की महाराष्ट्राच्या पुण्यात उत्पादित बेंजर पेंट्स महाराष्ट्रातील सर्व मोठ्या शहरांमध्ये तसेच गुजरात, राजस्थान, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, बिहार, गोवा, दिल्ली, उत्तर प्रदेश, कलकत्ता इत्यादी मोठ्या राज्यांमध्ये सर्वाधिक विक्रीची पेंट आहेत.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!