किर्लोस्कर इंडस्ट्रीज कडून२७५ कोटींची फसवणूक : अतुल किर्लोस्कर यांना मदत केल्याबद्दल सेबीने अलवाणी यांना ठोठावला दंड

933

पुणे प्रतिनिधी:-

फसव्या आणि अन्यायकारक व्यापार गुंतवणुकी प्रकरणा संबंधी किर्लोस्कर इंडस्ट्रीज (केआयएल) चे संचालक, ए.एन. अलवानी यांना सेबीने १५ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. कंपनीच्या 15% मालक असलेल्या प्रमोटर्सना त्यांनी रु. २७५ कोटीच्या घोटाळ्यात मदत केली.ज्यामुळे  त्यांना भांडवली बाजारात सहा महिन्यांच्या कालावधी साठी प्रतिबंधित केले गेले आहे. अलवणी यांनी आपल्या वैयक्तिक ट्रेडिंग अकाऊंट मधुन शेअर्समध्ये व्यापार केला नसला तरी सेबीने असे नमुद केले आहे की त्यांच्याकडे यूपीएसआयचा ताबा असल्याने ते इनसाईडर होते. ते किर्लोस्कर इंडस्ट्रीज (केआयएल) च्या वतीने अधिकृत “एजंट” म्हणून व्यापार करीत होते. केआयएल प्रमोटर्सला त्यांचे किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड (केबीएल) चे शेयर्स किर्लोस्कर इंडस्ट्रीजला (केआयएल) विकण्यास त्यांनी मदत केली, आणि यामुळेच केआयअल आणि कंपनीच्या सार्वजनिक / अल्पसंख्याक भागधारकांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर सेबीच्या कारवाई मध्ये केला गेला आहे. २७ जुलै २०१० रोजी झालेल्या केबीएलच्या बोर्डाच्या बैठकीत व्यवस्थापनाने केबीएलच्या कमकुवत नफ्याची गोष्ट उघडकीस आणली. सेबीच्या नियमांनुसार ही अतीशय गोपनीय माहिती आणि यूपीएसआय सुद्धा आहे. या मंडळाच्या बैठकीस हजेरी लावणारे केबीएल संचालक गौतम कुलकर्णी, राहुल किर्लोस्कर आणि ए.एन. अलवानी हे या यूपीएसआयमध्ये गुप्तपणे होते. दुसर्‍याच दिवशी २८ जुलै रोजी किर्लोस्कर इंडस्ट्रीजच्या बोर्डाच्या बैठकीत अध्यक्ष अतुल किर्लोस्कर, राहुल किर्लोस्कर यांचे भाऊ, यांनी एक नवीन गोष्टीचा समावेश केला जी गोष्ट अजेंडामध्ये नव्हती. त्यांनी असे सुचविले की किर्लोस्कर इंडस्ट्रीज ने केबीएल समभाग खरेदी करून आपल्या अतिरिक्त निधीची गुंतवणूक करावी. त्यांनी केबीएल चांगली कामगिरी करेल असे खोटे प्रतिनिधित्व केले.ही अतिशय धक्कादायक बाब आहे.

किर्लोस्कर इंडस्ट्रीजने केबीएल शेअर्स खरेदी करावे हे सुचविल्या नंतर अतुल किर्लोस्कर आणि निहाल (गौतम कुलकर्णी यांचा मुलगा) विक्रेते म्हणून थेट रस घेत होते. अतुल किर्लोस्कर यांच्या अनुपस्थितीत ए.एन. अलवाणी, मंडळाच्या बैठकीचे अध्यक्षपद असलेले तत्कालीन अध्यक्ष ए.आर. साठे आणि अन्य संचालक यांनी केबीएल समभाग खरेदी करण्यासाठी दोन गटात मतदान केले.

सेबीने म्हटले आहे की किर्लोस्कर इंडस्ट्रीजच्या ऑडिट कमिटीचे अध्यक्ष असलेले अलावानी हे केबीएल बोर्ड वर देखील होते आणि ते कार्यकारी संचालक नसल्याने त्यांना केबीएलशी जोडलेली व्यक्ती ठरविले गेले आहे. त्यामुळे हे अपेक्षित आहे की केबीएलच्या अप्रकाशित किंमतीची संवेदनशील माहिती मिळवण्याचा एक्सेस त्यांच्याकडे होता. त्यांनी किर्लोस्कर इंडस्ट्रीज बोर्ड बैठकीत भाग घेतला होता आणि यूपीएसआय एक्सेस आणि प्रत्यक्ष सहभागाद्वारे त्यांनी केआयएलला, केबीएलचे शेअर्स खरेदी करण्यास उद्युक्त केले असे सिद्ध होते.
आदल्या दिवशी केबीएलच्या कमकुवत नफ्याबद्दल ऐकूनही .अलवानी यांनी अन्य संचालकांना किर्लोस्कर इंडस्ट्रीद्वारे केबीएलच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणे चुकीचे ठरेल असे सांगितले नाही, याचबरोबर प्रत्यक्ष सहभागी होऊन शेअर्स खरेदी करण्यास मतदान केले. हे शेयर्स दीर्घ मुदतीसाठी खूपच कमी नफा असणारे होते. कंपनीच्या 15% मालक असलेल्या प्रमोटर्सना त्यांनी रू. 275 कोटी रुपयांच्या शेयर्स गुंतवणुकी मध्ये मदत केली.
अंतर्गत व्यापार आणि सार्वजनिक भागधारकांची फसवणूक केल्या प्रकरणी गौतम कुलकर्णी, राहुल किर्लोस्कर, अतुल किर्लोस्कर, अल्पना किर्लोस्कर, ज्योत्स्ना कुलकर्णी आणि आरती किर्लोस्कर यांनाही सेबीने ४५ दिवसांमध्ये ३१.२१ करोड रुपये भरण्यास सांगितले आहे. याचबरोबर त्यांना भांडवली बाजारात ६ महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे