Homeताज्या घडामोडीमराठा समाजाचा लग्न व्यवस्थे संदर्भात आचारसंहिता जाहीर

मराठा समाजाचा लग्न व्यवस्थे संदर्भात आचारसंहिता जाहीर

महाराष्ट्राला एक आदर्श घालून देण्याचा निर्धार…

अनिल चौधरी,पुणे  

मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे यांनी हुंड्यासाठी सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्यानंतर मराठा समाजाच्या वतीने विवाह आचार संहिता तयार करून लग्न समारंभातील सर्व चुकीच्या चालीरीती, पद्धती, बडेजावपणा याबाबत काही कठोर निर्णय घेण्यासाठी बैठकांचे आयोजन करण्यात आले होते.

स्वोजस पॅलेस सोलापूर रोड हडपसर हवेली मध्ये मराठा समाज बांधवांची बैठक होऊन त्यामध्ये विवाह आचारसंहिता बाबत सर्वानुमते पाठिंबा देण्याचे ठरविण्यात आले.
यावेळी राजेंद्र कोंढरे, राजेंद्र कुंजीर, उत्तम कामठे, रोहिदास उंद्रे, गुलाब गायकवाड, कमलेश काळभोर, संतोष भोसले, दुर्योधन कामठे, सूर्यकांत काळभोर, रमेश उंद्रे, गजानन जगताप, अनिरुद्ध मराठे, भाऊ जाधव, राजेश काळभोर, काळूराम चौधरी, महादेव कुंजीर, भाऊसाहेब महाडिक, सचिन सुंबे, सुनील तुपे, अमोल भोसले, बापू चौधरी,अनिल ताडगे, सचिन आडेकर आदिसह मोठ्या प्रमाणावर समाज बांधव उपस्थित होते.
या कार्यक्रमात महिलांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली हुंडा विषयीची कविता विद्यार्थिनी शिवांजली कामठे हिने म्हणून दाखवली.
मराठा समाजाने विवाह विषयी केलेली आचारसंहिता वाचून दाखवण्यात आली. समाजात हुंडाबळी जाऊ नये म्हणून विविध बावीस मुद्दे या आचारसंहितेत घेतले आहेत. यामध्ये लग्नकार्याचे सर्व कार्यक्रम एकाच दिवशी घेण्यात यावे, बुफे पद्धत बंद करावी, स्टेजवर पुढाऱ्यांची गर्दी कमी करावी, लग्न वेळेवर लावून सर्वांच्या वेळेची बचत करावी, प्री-वेडिंग अजिबात करू नये, लग्नाचा खर्च मुलांचे शिक्षणासाठी किंवा त्यांचे व्यवसायाच्या भांडवलासाठी वापरावा, नवरा नवरीला आशीर्वाद देण्यासाठी समाजातील जेष्ठ व्यक्तीला सांगावे,ज्या कुटुंबाची पार्श्वभूमी हुंडा किंवा काही कारणास्तव छळ होत असेल अशा कुटुंबाशी संबंध होणार नाही याची काळजी घ्यावी, सासरी होणाऱ्या अन्यायाबद्दल मुलीच्या पुढील जीवन सुसह्य होण्यासाठी माहेरच्या लोकांनी पुढाकार घ्यावा तसेच मराठा समाजातील सर्वांनी एकत्र येऊन एक कमिटी तयार करून सर्व मंगल कार्यांलयांना समाजाने तयार केलेली आचारसंहिता फलकावर लावण्यासाठी सांगावे.
अशा पद्धतीने सर्वानुमते समाजाची प्रगतीसाठीची आचारसंहिता तयार करून सर्वानुमते ती मान्य करण्यात आली.
बैठकीच्या आयोजन सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा हडपसर हवेली विभागातर्फे करण्यात आले. बैठकीचे सूत्रसंचालन शिवश्री उत्तम कामठे यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments