कोंढवा खुर्द भागातील सामाजिक कार्यकर्ते उद्योजक व अर्निंका चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष कै निखिल अनंता लोणकर यांचे सोमवार नऊ जून रोजी आस्कमिक निधन झाले असून त्यांच्या अचानक जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
अनेक धार्मिक , सामाजिक कार्यात त्यांनी सहभाग घेतला होता. अर्निका चॅरिटेबल ट्रस्ट ची स्थापना करून अनेक गोरगरीब रुग्णांवर ते व त्यांच्या पत्नी डॉ रसिका लोणकर यांच्या मार्फत मोफत उपचार व औषधें देत होते. वयाच्या ३६ व्या त्यांचे निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांसह इतरांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या पश्चात आई ,वडील, पत्नी,मुलगी ,3 बहिणी,सामाजिक कार्यकर्ते श्री अनंता सोपानदेव लोणकर यांचे चिरंजीव तसेच श्री देवानंद लोणकर आणि श्री सुरेश लोणकर, सासरे दत्तात्रय गोते , उषा गोते , नवनाथ गोते , मा. नगरसेवक तानाजी लोणकर, मा. श्री.नगरसेवीका सौ. नंदा लोणकर यांचे पुतणे ,शासन नियुक्त नगरसेवक श्री.राजेंद्र भिंताडे मामे भाऊ होत.