Homeताज्या घडामोडीपत्रकारांना वृत्तांकनासाठी पोलीस अडथळा; संघांनी आयुक्तांना निवेदन दिले

पत्रकारांना वृत्तांकनासाठी पोलीस अडथळा; संघांनी आयुक्तांना निवेदन दिले

पुणे,

 सिंहगड रस्त्यावरील नवीन पुलाच्या उद्घाटन प्रसंगी पत्रकारांना वृत्तांकन करण्यास पोलीसांनी अडथळा निर्माण केल्यामुळे पत्रकार संघांनी या बाबतीत निषेध व्यक्त करत बुधवारी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना निवेदन दिले.

या आधी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या पुलाच्या उद्घाटन कार्यक्रमात पत्रकारांना वृत्तांकनासाठी पुढे जाऊ दिले न गेल्याने संताप व्यक्त करण्यात आला होता. या प्रसंगी पोलीसांनी पत्रकारांशी वेगळीच वागणूक केल्याचा आरोप करण्यात आला. या घटनेचा निषेध म्हणून श्रमिक पत्रकार संघ, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद (मुंबई सलग्न), पुणे महानगर पत्रकार संघ, अखिल जनलोक संपादक व पत्रकार संघ व इतर संघटनांच्या पत्रकार सदस्यांनी आज सकाळी ११.३० वाजता पोलीस आयुक्तांना भेट दिली.

या भेटीदरम्यान घटनेबाबत चर्चा करून भविष्यात अशा प्रकारची घटना घडू नये यासाठी योग्य सहकार्य करण्याची अपेक्षा संघटनांनी व्यक्त केली. श्रमिक पत्रकार संघाकडून आयुक्तांना निवेदन देण्यात आले. एस.एम. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या पुणे महानगर पत्रकार संघ व अखिल जनलोक संपादक व पत्रकार संघ यांनी या निवेदनास पाठिंबा दर्शविला. यावेळी विविध पत्रकार संघांचे अध्यक्ष, सचिव, पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

या निमित्ताने पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कार्यक्रम प्रसंगी पत्रकारांना वृत्तांकन करताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी योग्य नियोजन व नियमावली आखण्यासंदर्भात विचारविनिमय करण्याचे आश्वासन दिले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments