Homeपश्चिम-महाराष्ट्रपुणेअनिल मोरे यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई, डिजिटल मिडिया - प्रदेश...

अनिल मोरे यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई, डिजिटल मिडिया – प्रदेश समन्वयकपदी निवड

पुणे / मुंबई
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई डिजिटल मिडिया प्रदेश समन्वयकपदी अनिल मोरे यांची निवड करण्यात आली आहे.
पत्रकार संघटनेच्या उद्दिष्टांची राज्यभर प्रभावी अंमलबजावणी करून डिजिटल माध्यमातून पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी तसेच संघटना अधिक मजबूत करण्यासाठी ही महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.
प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ संजय भोकरे यांनी अनिल मोरे यांची निवड जाहीर करताना सांगितले की, “पत्रकार संघटनेच्या कार्याचा अनुभव लक्षात घेऊन त्यांच्यावर राज्यभरातील सर्व जिल्हाध्यक्षांशी समन्वय साधण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली संघटना निश्चितच अधिक सक्षम होईल, असा आम्हाला विश्वास आहे.”
निवडीनंतर नवनियुक्त प्रदेश समन्वयक अनिल मोरे यांनी पत्रकार संघटनेबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना सांगितले की, “डिजिटल मीडियाच्या माध्यमातून संघटनेचे कार्य प्रत्येक जिल्ह्यात पोहोचविण्यासाठी आणि पत्रकारांच्या प्रश्नांसाठी ठोस पावले उचलली जातील. आगामी काळात संघटनेची राज्यभर मजबूत बांधणी केली जाईल.”
या निवडीनंतर पत्रकारितेतील विविध मान्यवरांनी तसेच सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनी अनिल मोरे यांना शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments