Monday, November 17, 2025
Google search engine
Homeपश्चिम-महाराष्ट्रपुणेरोटरॅक्ट क्लब सिंहगड रोडच्या अध्यक्षपदी कृष्णा मरळ यांची निवड.

रोटरॅक्ट क्लब सिंहगड रोडच्या अध्यक्षपदी कृष्णा मरळ यांची निवड.

पुणे (दि.१४) रोटरॅक्ट क्लब सिंहगडच्या अध्यक्षपदी कृष्णा मरळ याची निवड करण्यात आली. सचिवपदी सृष्टी शिरोरे यांची निवड करण्यात आली. सेवासदन एरंडवणा येथील सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे रोटरी क्लब सिंहगडचे अध्यक्ष अमेय पासलकर, PHF- DRR द्विजेश नासिककर, माजी अध्यक्ष सौरभ दप्तरदार, रोटरी क्लब सिंहगडच्या माजी अध्यक्ष मृण्मयी पासलकर आदी मान्यवरांच्या बरोबरच रोटरी व रोटरॅक्ट पदाधिकारी व सदस्य मोठ्या संखेने उपस्थित होते. या प्रसंगी बोलतांना नवनिर्वाचित अध्यक्ष कृष्णा मरळ यांनी आगामी काळात सदस्यांच्या व्यावसायिक कौशल्ये व संघटना याबद्दल विविध प्रकल्प राबविणार असल्याचे सांगितले. अमेय पासलकर यांनी आगामी काळात येणारी आव्हाने स्वीकारण्याची व त्यासाठी विविध कौशल्ये सदस्यांनी आत्मसात करावीत असे आवाहन केले. व यासाठी आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!