उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कारवाई करण्याचे आदेश देऊनही प्रशासन ठप्प
अनिल चौधरी, पुणे
मे २०२२ मध्ये वीणा वर्ल्ड टूर अँड ट्रॅव्हल्सच्या मॅनेजर च्या चुकीच्या निर्णयामुळे लेह येथे आपल्या पतीला गमावलेल्या श्रीमती तारामती शिवाजी गांगर्डे यांचे अश्रू कोण पुसणार असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. दोन वेळेस उपमुख्यमंत्र्यानी लेखी व तोंडी आणि मोबाईल द्वारे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांना आदेश देऊनही या महिलेला अजूनही न्याय मिळाला नसल्याचे त्यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
याबाबतची सविस्तर माहिती अशी कि, वीणा वर्ल्ड ह्या प्रतिष्टीत कंपनीची जाहिरात पाहून त्यांनी आपले दिवंगत पती शिवाजी गांगर्डे यांच्यासह लेह लडाख येथे जाण्याचा निर्णय घेतला . प्रतिष्टीत टूर कंपनी असल्याने ते आपली काळजी घेतील आणि व्यवस्थित परत आणतील अशी अपेक्षा बाळगून गांगर्डे दापंत्याने २१ मे २०२२ रोजी लेह लडाख ट्रिप चे पैसे भरले . सगळे छान सुरु होते परंतु लेह येथे पोहताच पती शिवाजी गांगर्डे यांना खोकल्याचा त्रास सुरु झाला. याबाबत त्यांनी टूर मॅनेजर धीरज चौधरी यांच्याशी संपर्क केला परंतु येथील हवामान असेच असते म्हणून त्यांनी वेळ मारून नेली. यानंतर त्यांची तब्येत थोडी बिघडत असल्याची दिसताच त्यांनी पुन्हा विना वर्ल्डच्या टूर मॅनेजरशी संपर्क करून जवळील हॉस्पिटल मध्ये नेण्यास सांगितले. परंतु या मॅनेजर ने हॉस्पिटल मध्ये न नेता ट्रिप मधील दातांच्या डॉक्टर कडून कुठलीतरी गोळी घेऊन ती त्यांना दिली. यानंतर माझे पती रुम मध्ये झोपी गेले. परंतु त्यांचा झोपेतच मृत्यू झाला. ट्रिप मधील व्यक्तीचा मृत्यू होऊन सुद्धा या मॅनेजर ने पुढील ट्रिप सुरु ठेवून मला माझ्या पतीच्या मृतदेहाला एकटे सोडून ते गेले. यावेळी लेह पोलिसांनी मॅनेजरशी संपर्क करून तुम्हाला काही माणुसकी आहे कि नाही आणि पोलिसी भाषेत सांगितल्याने त्याने तेथील एक अनोळखी व्यक्ती सोबत दिला व इतर लोकांना घेऊन पुढील लडाख ट्रिप ला घेऊन गेला . यानंतर या मॅनेजर ने लोकल पोलिसांशी काहीतरी बोलून दाताच्या डॉक्टर ने दिलेली औषधे माझ्याकडून काढून घेतली. यानंतर माझ्या पतीचे पोस्ट मार्टम केले गेले. मला त्या मॅनेजर सांगितले उद्या सकाळी सात वाजता तुमचे विमान असून तुम्ही चार वाजता विमानतळावर पोहोचा . सकाळी दहा वाजल्यानंतर सुद्धा विमान बाबत माहिती न मिळाल्याने त्यांनी विमानतळ अधिकाऱयांशी संपर्क केला असता त्यांचे विमानाचे तिकीटच बुक नसल्याचे सांगितले यावेळी त्यांनी तेथील अधिकाऱ्याना विनंती करून एक तिकीट मिळवून पुण्याला आल्या. अशा रीतीने दोन दिवस मृतदेहाची अवहेलना या विना टूर च्या मॅनेजर मुळे झाली. आपल्या पतीचे सर्व विधी सोपस्कार पार पाडून त्यांनी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला असता त्याची दाखल घेतली नाही म्हणून त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क करून त्यांच्या अर्जावर त्वरित कारवाई करण्याचे शिंदे यांनी लिहून दिले असता भोसरी पोलीस ठाण्यात २० जून २०२३ रोजी गुन्हा दाखल झाला परंतु आज पर्यंत यावर काहीच कारवाई झाली नाही. यानंतर या महिलेने पुन्हा एकनाथ षीने यांच्या महिला दिन कार्यक्रमात याबाबत दाद मागितली असता त्यांनी त्वरित वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांशी संपर्क करून कारवाई करण्याचे सांगितले परंतु यानंतर सुद्धा प्रशासन ठप्प असून याबाबत या महिलेला न्याय कधी मिळणार असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
याबाबत या महिलेने स्थानिक आमदार महिला आयोग, पंतप्रधान कार्यालय, गृहमंत्रालय, मुख्यमंत्री कार्यालय येथे वारंवार विनंती अर्ज देऊनही काही कारवाई झालेली नाही यामुळे त्यांनी मला जर न्याय मिळाला नाही तर मी आत्मदहन करणार असल्याचा इशारा देखील दिला आहे.
याबाबत आम्ही विना वर्ल्ड चे मॅनेजर धीरज चौधरी यांना संपर्क केला असता त्यांनी फोन उचलला नाही तसेच भोसरी कार्यालयात देखील फोन केला असता त्यांनी तो उचलल नाही.



