Homeताज्या घडामोडीतुकाराम मुंडेंचा वानवडीत दणका ; वानवडीत अन्न व औषध...

तुकाराम मुंडेंचा वानवडीत दणका ; वानवडीत अन्न व औषध विभागाची कारवाई…

वानवडी प्रतिनिधी,

वानवडीत शिवरकर रस्त्यावरील पान टपऱ्यांवर अन्न व औषध विभागाने (FDA) धडक कारवाई केली आहे. या कारवाईत शासनाने प्रतिबंधित केलेला ९ हजार ४३ रुपये किमतीचा पानमसाला आणि सुगंधित सुपारी जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
भोलानाथ पान शॉप, लव्हली पान शॉप व घंटा पान शॉप या दुकानांवर वानवडी पोलिसांच्या सहकार्याने व आय ए एस अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न व औषध विभागाच्या अन्न सुरक्षा अधिकारी हेमा सोनकांबळे, प्रतीक जाधव आणि पूजा चव्हाण यांच्या पथकाने ही कारवाई केली.
मुख्य सप्लायर रडारवर:
या कारवाईबाबत माहिती देताना अन्न व औषध विभागाचे असिस्टंट कमिशनर खोसे यांनी सांगितले की, “केवळ पान टपऱ्यांवर कारवाई करून आम्ही थांबणार नाही. या प्रतिबंधित मालाचा पुरवठा करणाऱ्या मुख्य सप्लायरचा (घाऊक विक्रेता) शोध सुरू असून, लवकरच त्याच्यावरही कडक कारवाई केली जाईल.”

नागरिकांना शुद्ध आणि सुरक्षित अन्न मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे. भेसळ, निकृष्ट दर्जाचे अन्न किंवा प्रतिबंधित पदार्थांचे उत्पादन व विक्री आढळल्यास यापुढे आणखी कठोर कारवाई करण्यात येईल,” असा स्पष्ट इशारा अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे. अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत शंका असल्यास नागरिकांनी अन्न व औषध प्रशासनाशी संपर्क साधावा. यासाठी स्वतंत्र तक्रार नोंदणी अॅप विकसित करण्यात आले आहे.
टोल फ्री क्रमांक : १८००२२२३६५
ई-मेल : jc-foodhq@nic.in
तक्रार करताना नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, संबंधित आस्थापनेचा अचूक पत्ता आणि कोणत्या अन्नपदार्थात भेसळ होत असल्याची माहिती नमूद करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments