ब्रम्हमुहूर्त योग ज्ञानपीठ केंद्रातर्फे बिपीन रावत यांना श्रद्धांजली

953

कोंढवा प्रतिनिधी :-

ब्रम्हमुहूर्त योग ज्ञानपीठ केंद्रातर्फे कोंढवा, वानवडी, धनकवडी, कात्रज , सहकारनगर येथे नगारिकांच्या उत्तम, निरोगी  आरोग्यासाठी मोफत योगा क्लासेस चालविले जातात. सदर क्लासेस ब्रम्हमुहूर्त म्हणजेच पहाटे पाच ते साडेसहा या वेळेत असतात.

 तामिळनाडूच्या कुन्नूरजवळ झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात प्राण गमावणारे देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत त्यांची पत्नी आणि त्यांच्यासह असलेले वरिष्ठ १३ अधिकारी या हेलिकॉप्टर अपघातात शहीद  झाले. त्यांना ब्रम्हमुहूर्त योग ज्ञानपीठ केंद्र कोंढवा हॉलच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.