स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळाचा वर्धापन दिन साजरा

617

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : मोशी,चऱ्होली, धानोरे या पंचक्रोशीत शैक्षणिक कार्य करणाऱ्या स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळाचा २८ वा वर्धापन दिन स्पर्धा पारितोषिक वितरण,पालकांची मनोगते, सामाजिक , शैक्षणिक उपक्रमांनी मोठ्या दिमाखात उत्साही आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला.
या प्रसंगी मोशी येथील प्रशालेत संस्थेचे पदाधिकारी उखर्डा भोंगाळे, कविता भोंगाळे, सरिता भोंगाळे, संजय भोंगाळे, अंजली भागवत, काजल छतीजा यांचेसह संस्थेच्या तिन्ही शाखेचे प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शालेय मुले उपस्थित होते. याप्रसंगी स्थापना दिना निमित्त दीप प्रज्वलन,प्रतिमा पूजन करून सुरुवात करण्यात आली.
या प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विनायक भोंगाळे यांनी संस्थेचे स्थापने पासून प्रगतीचा आढावा मांडला. ते म्हणाले, संस्थेची प्रगती होत असताना अनेक खडतर अनुभव आले. अथक परिश्रम नंतर संस्था विकासाची वाटचाल करीत आहे. खूप परिश्रम,कष्ट घेत संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी पदाधिकारी यांनी काम केले आहे. परिश्रमातून कोणतेही कार्य सहज सध्या होते. माझ्यासह माझया सर्व सहकारी पदाधिकारी यांनी यासाठी काम केले आहे. यात शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी,सेवक यांचेही मोठे योगदान आहे. संस्थेच्या विकासात कविता भोंगाळे,सरिता भोंगाळे यांचे ही मोठे योगदान असल्याचे त्यांनी सांगितले.
या स्थापना दिनाचे औचित्य साधून संस्थेच्या शाखेतील विविध स्पर्धांचा पारितोषयक वितरण समारंभ देखील उत्साहात पार पडला . विजेत्या मुलांना सन्मान चिन्ह देऊन देऊन आणि उपस्थित पदाधिकारी यांना संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. या प्रसंगी उत्साही पालकांनी आपले मनोगतातून संस्थेच्या कार्याचा गौरव केला. संस्थेच्या वाटचालीत स्थापनादिन प्रेरणादायी ठरला.