आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील पोलिस मित्र युवा महासंघ आळंदी शहराध्यक्षपदी सुदिप नानासाहेब गरूड यांची नियुक्ती झाली करण्यात आली.
आळंदीतील तुळजाभवानी मंदिरात पोलिस मित्र युवा महासंघ शहराध्यक्ष पदी सुदिप गरूड यांची नियुक्ती पत्र देऊन करण्यात आली. या प्रसंगी पोलिस मित्र युवा महासंघ चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रविण बोबडे, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष शशिकांत राजे जाधव, पच्छिम महाराष्ट्र अध्यक्ष बाळासाहेब ठाकूर, पुणे जिल्हा सचिव लक्ष्मण उभे, पुणे जिल्हा संघटक बाबासाहेब भंडारे, खेड तालुका अध्यक्ष विष्णू घुंडरे आदी उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष प्रविण बोबडे यांचे हस्ते भाजी मंडई तरुण मंडळाचे अध्यक्ष सुदीप गरुड यांना नियुक्ती पत्र देऊन अभिनंदन करण्यात आले.