आळंदीत विठ्ठल रुख्मिणी धर्मशाळेच्या इमारतीस आग ; सुदैवाने जीवित हानी टळली मात्र प्रचंड नुकसान

577

अर्जुन मेदनकर, आळंदी  : येथील भागीरथी नाल्या लगत असलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी ट्रस्ट या धर्मादाय असलेल्या जुन्या धर्मशाळेच्या पत्राशेड वीट माती, बांधकाम लाकडी इमारतीला अचानक फ्रीज मध्ये शॉर्ट सर्किट होऊन स्फोट झाल्याने आग लागली. या आगी दरम्यान घरातील सिलेंडरचा स्फोट झाला. यात जुन्या लाकडी इमारतीने पेट घेतला. या दुर्दैवी घटनेत इमारतीचे आणि त्यातील साहित्याचे प्रचंड नुकसान झाले. मात्र सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. या घटनेत सतर्कतेमुळे जीवित हानी टळली . सुमारे तीन तासावर परिश्रम पूर्वक काम केल्यानंतर आग आटोक्यात आली.
यासाठी आळंदी नगरपरिषद,चाकण नगरपरिषद आणि पीएमआरडीए अग्निशामक दलाचे तीन बंब, खाजगी पाण्याचे टँकर, फ्रुटवाले धर्मशाळेत अग्निशामक यंत्रणा वापरीत अग्नी शामक दलातील सेवक कर्मचारी, आळंदी देवस्थानचे कर्मचारी सेवक, पोलीस कर्मचारी, वीज महावितरणचे कामगार, सुरक्षा जवान, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक आणि पोलीस अधिकारी , महसूल प्रशासन यांनी आग विझविण्याकामी विशेष मदत व सहकार्य केल्याने मोठी दुर्घटना आटोक्यात आली. दरम्यान नगरप्रदक्षिणा मार्ग वाहतुकीस काही वेळ बंद ठेवण्यात आला. वीज पुरवठा खंडित करून आग विझविण्याचे काम प्राधान्याने करण्यात आले.
भागीरथी नाल्या लगत श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिर ट्रस्ट मिळकत मालमत्ता क्रमांक २१७२ ही मिळकत जुनी लाकडी बांधणीची इमारत आहे. या धर्मशाळेत अनेक वर्षां पासून पांडुरंग क्षीरसागर, बाळू क्षीरसागर, मुकुंद क्षीरसागर आणि क्षीरसागर परिवार धर्मशाळेचे कामकाज पाहत आहेत. या इमारतीत अचानक फ्रीजमध्ये बिघाड होऊन शॉर्ट सर्किटने फ्रीज मध्ये स्फोट झाला. त्यानंतर इमारतीला आग लागली. पहिल्या मजल्यावरून खाली आगीने पेट घेतला. या घटनेत घरातील सिलेंडरचा स्फोट झाल्याने आगीने आणखी वेग घेतला. यावेळी परिसरात एकच धावपळ झाली. यात अग्निशमन यंत्रणेत काम करीत असलेल्या जवान गुडघ्यावर पडल्याने जखम झाला. अशाही धावपळीत आग विझविण्याचे काम करून सामाजिक बांधिलकी जोपासली. या घटनेत जीवित हानी नाही. मात्र वित्त हानी खूप झाली. सुमारे तीन तासावर प्रयत्ना नंतर आग आटोक्यात आल्याचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी सांगितले. यासाठी अग्निशमन विभाग प्रमुख अक्षयकुमार शिरगिरे, विद्युत विभाग व पाणी पुरवठा प्रमुख दत्तात्रय सोनटक्के, जयदीप खैरे,अमोल खैरे, विजय पवार,अरुण घुंडरे, प्रसाद बोराटे, अजित घुंडरे, अमित घुंडरे, पोलीस हवालदार मच्छिन्द्र शेंडे, माजी नगरसेवक संतोष चोरडिया, प्रशांत कुऱ्हाडे, भरत गोरे, ज्ञानेश्वर सोनवणे, आकाश जोशी, तुकाराम माने, रुपाली पानसरे आदींनी तसेच परिसरातील नागरिकांनी सतर्क राहून मदत कार्य केले. यामुळे आग आटोक्यात येण्यास मदत झाली. या आगीत घरातील साहित्य, कपडे, भांडी, महत्वाची कागदपत्र जळली. यात सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र क्षीरसागर परिवाराचे प्रचंड नुकसान झाले. यावेळी तीन अग्निशमन वाहने , खाजगी पाण्याचे टँकर, फ्रुटवाले धर्मशाळेत अग्नी सुरक्षा यंत्रणा वापरून परिश्रम पूर्व आग विझविण्यात आली.