संत ज्ञानेश्वर पालखी सोहळा प्रमुख अँड. ढगे पाटील यांचा सत्कार

647

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटीचे विश्वस्त ॲड. विकास ढगे पाटील यांची माऊलींचे पालखी सोहळा प्रमुख पदी निवड झाली. या निमित्त त्यांचा संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष ॲड.विष्णू तापकीर यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
ॲड. विकास ढगे पाटील यांची आषाढी वारी २०२२ साठी पालखी सोहळा प्रमुख पदी फेर निवड झाली. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख पदी सलग दुसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल अध्यक्ष ॲड.विष्णू तापकीर यांच्या हस्ते थोरल्या पादुका देवस्थान ट्रस्ट तर्फे शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी ॲड. तापकीर यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले. वारकरी संप्रदायातील विविध संस्था, आळंदी पंचक्रोशीतून विविध पदाधिकारी, दिंडी प्रमुख यांनी या निवडीचे स्वागत केले.