आळंदी ( अर्जुन मेदनकर) : आळंदी पंचक्रोशीत महाराष्ट्र दिन व कामगार दिन विविध शासकीय कार्यालये, शाळा, अशासकीय संस्था मध्ये विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.
येथील मुक्तादेवी शिक्षण प्रसारक मंडळ व पद्मावती देवी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ग्यान ज्योत इंग्लिश स्कूल मध्ये महाराष्ट्र दिन व कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजाचे ध्वजारोहण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र घुंडरे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी संचालिका कीर्ती घुंडरे, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
येथील भैरवनाथ चौकातील ज्ञानदीप प्रतिष्ठाण संचलित ज्ञानदीप इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये संस्थेचे अध्यक्ष वैजीनाथ ठवरे यांचे अध्यक्षतेखाली आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ध्वज पूजा यशवंत संघर्ष सेनेचे अध्यक्ष विष्णू कुऱ्हाडे, उपाध्यक्ष भागवत काटकर आदींचे हस्ते झाले. यावेळी एल्गार सेनेचे आळंदी शहर अध्यक्ष बाळासाहेब कवळासे,
यशवंत संघर्ष सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष विष्णु दादा कुर्हाडे, उपाध्यक्ष भागवत काटकर, आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, अनिल जोगदंड, सिध्देश्वर दादा सलगर, बाळासाहेब खांडेकर, शिवशंकर आघाव, गोविंद ठाकूर तौर आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र दिना निमित्त आळंदी नगरपरिषद,आळंदी पोलीस ठाणे,मंडल आधिकारी व तलाठी कार्यालयात ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला वंदन करण्यात आले. हुतात्मा झालेल्या वीर सुपुत्रांच्या त्यागाच स्मरण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. या निमित्त विविध राजकीय पक्ष संघटना, सेवाभावी संस्था, सामाजिक कार्यकर्ते यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार व पुष्प अर्पण करुनाभिवादन केले. यावेळी शहर प्रमुख अविनाश तापकीर, उपप्रमुख शशिकांत राजे जाधव ,रमेश गोगावले, चारुदत्त रंधवे , शिवसैनिक, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. बेळगाव सहित संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशी मागणी यावेळी करण्यात आली.
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत सिद्धार्थ ग्रुप तर्फे अक्षय रंधवे यांचे प्रयत्नातून इफ्तार पार्टी चे आयोजन करण्यात आले. आळंदीतील मुस्लिम समाज बांधव आणि नागरिकांनी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात इफ्तार पार्टी उत्साहात झाली.