आळंदीत माऊलींचे समाधीवर चंदनउटीतुन साकारला पांडुरंग अवतार

431

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात अक्षय तृतीये निमित्त श्रींचे संजीव समाधीवर चंदन उटीचा वापर करून विविध लक्षवेधी वस्त्रालंकारांचा तसेच लक्षवेधी फुलांचा वापर करून श्रींचे समाधीवर चंदनउटीतुन भगवान पांडुरंग अवतारातील लक्षवेधी वैभवी रूप साकारण्यात आले. भाविकांनी श्रींचे मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती.
माऊली मंदिरातील प्रथा परंपरांचे पालन करीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान पालखी सोहळ्याचे प्रमुख ऍड विकास ढगे पाटील, थोरल्या पादुका देवस्थानचे अध्यक्ष ऍड विष्णू तापकीर, विश्वस्त डॉ. अभय टिळक, व्यवस्थापक माउली वीर आदी यावेळी उपस्थित होते.
अक्षय तृतीया दिनाचे कार्यक्रमात पहाटे घंटानाद, काकडा आरती, श्रींचे संजीवन समाधीला पवमान अभिषेक, दुधारती करण्यात आली. दरम्यान साडेपाचच्या सुमारास श्रींचे चल पादुकांवर भाविकांचे महापूजा सुरु झाल्या. त्यानंतर श्रींना महानैवेद्य झाला. दुपारी अडीच चे सुमारास श्रींचे संजीवन समाधीवर चंदन उटीला सुरुवात करण्यात आली. चंदन उटी काळात श्रींचे समाधी दर्शन बंद ठेवत श्रींचे पादुका दर्शन भाविकांना कारंजा मंडपात सुमारे सहा वाजे पर्यंत सुरु ठेवण्यात आले होते. चंदन उटी साकारताच भाविकांना कमी वेळेत जास्तीत जास्त भाविकांना दर्शन व्यवस्था आळंदी संस्थान ने केल्याची माहिती व्यवस्थापक माऊली वीर यांनी दिली. परंपरेने प्रवचन सेवा विना मंडपात झाली. कारंजा मंडपात हळदी कुंकू आणि गौरी पूजन उत्साहात झाले. यावेळी महिलांनी हळदी कुंकू साठी गर्दी केली. साडे आठच्या सुमारास धुपारती आणि नंतर शेजारतीने अक्षय तृतीयाचे धार्मिक कार्यक्रमाची सांगता झाली.