Monday, April 28, 2025
Google search engine
Homeपश्चिम-महाराष्ट्रपुणेग्लोबल आयकॉन्स ऑफ इंडिया' पुरस्काराने होणार विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव

ग्लोबल आयकॉन्स ऑफ इंडिया’ पुरस्काराने होणार विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव

पुणे : कशीश प्रॉडक्शन्सच्या वतीने पुणेकर प्रतु फाउंडेशनच्या सहकार्याने ‘ ग्लोबल आयकॉन्स ऑफ इंडिया’ या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पुरस्कार सोहळ्याचे हे तिसरे पर्व  आहे. यामध्ये चित्रपट सृष्टीसह फॅशन, बिजनेस, डॉक्टर अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन संन्मानित केले जाणार आहे. अशी माहिती कशीश प्रॉडक्शन्सचे संस्थापक,  मॉडेल ग्रुमर व अभिनेता – दिग्दर्शक योगेश पवार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी पुणेकर प्रतु फाउंडेशन संस्थापक प्रतिक शुक्ल, शो डायरेक्टर पुजा वाघ, प्रियांका मिसाळ, अंकुश पाटील,नेहा घोलप आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना योगेश पवार म्हणाले, आयोजक संस्थेच्या वतीने यातील काही निधी हा एच. आय. व्ही. ग्रस्त रुग्णांच्या मदतीसाठी दिला जाणार आहे. त्यामुळे अनेक सेलिब्रिटींनी यामध्ये आपला सहभाग नोंदवला आहे. यापूर्वी हे पुरस्कार आयपीएस कृष्णा प्रकाश, दिग्दर्शक दीग्पाल लांजेकर आदींना प्रदान करण्यात आले आहेत. दिग्दर्शक, मेकअप आर्टीस्ट, फॅशन, अभिनय, बिजनेस, डॉक्टर, मॉडेल, सामाजिक कार्यकर्ते, वास्तू तज्ञ आशा विविध क्षेत्रातील व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. यामध्ये यंदा अभिनेत्री मीरा जगन्नाथ, सुरभी हांडे, डॉ. उत्कर्ष शिंदे, सुनील गोडबोले, हार्दिक जोशी, अरबाज शेख, अशोक फळदेसाई, तेजस बर्वे, संतोष पाटील, ऋषिकेश जोशी, वैभव चव्हाण, सिद्धार्थ खिरीड, सोनाली पाटील यांना गौरवण्यात येणार आहे.
‘ग्लोबल आयकॉन्स ऑफ इंडिया’  हा पुरस्कार वितरण सोहळा 19 जुलै 2022 रोजी अण्णाभाऊ साठे सभागृह, पद्मावती येथे होणार असल्याचेही पवार यांनी सांगितले.या फॅशन शो चे विशेष सहकार्य ‘ Rajasa by Ishan Ethnic collection’ आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!