नयन डान्स अकॅडेमीच्या डान्सरच्या एकापेक्षा एक डान्सने प्रेक्षक घायाळ

1072

अनिल चौधरी पुणे 

आपल्या देशात टॅलेन्टची कमी नाही. कोणत्या व्यक्तीमध्ये काय कला असेल हे सांगता येत नाही. सध्याच्या सोशल मीडियाच्या काळामध्ये तर असे वेगवेगळे हुनरबाज लोक आपल्याला नेहमीच दिसतात.  मात्रनयन डान्स अकॅडेमीच्या पलक गोलाणी यांच्या मार्गदर्शनात तयार झालेल्या चिमुकले तरुण मुला -मुलांनी  NDA च्या वार्षिक कार्यक्रमात आपले एकापेक्षा एक विविध डान्स प्रकार दाखवून  प्रेक्षकांना अक्षरक्षा: घायाळ केले.

नयन डान्स अकॅडेमीतर्फे दरवर्षी प्रशिक्षत केलेल्या मुला -मुलींचे डान्स आपल्या नातेवाईक मित्रमंडळींसाठी आयोजित केले जातात. यावर्षी वानवडी येथील महात्मा फुले सांस्कृतिक भवन येथे याचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाची सुरुवात संदीप जगताप यांचे हस्ते करण्यात आली. यामध्ये एका ९१ वर्षांच्या आजीने डान्स करून सर्वाना आचंबित केले. यामध्ये मुलांनी आणि महिलांनी अतिशय उत्कृष्ट असे डान्स चे विविध प्रकार करून उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली . उंड्री येथील जिल्हा परिषद शाळेतील मुलांनी अतिशय कमी वेळात डान्स प्रॅक्टिस करून सुंदर असा डान्स करून लोकांची मने  जिंकली त्यांना पलक  गोलाणी यांनी मोफत प्रशिक्षण  देऊन तयार केले होते. यावेळी लाहान मुलांचा तसेच महिलांचा तुझा रंग लागला छंद लागला देखो मै  देखू  कुदरत के नजारे चांद बालियाँ  आणि रोमियो रोमियो या डान्स ला लोकांनी भरपूर प्रतिसाद दिला कार्यक्रमाचे आयोजन पलक गोलाणी यांनी केले होते तर सूत्रसंचालन   केले . यावेळी संदीप जगताप शशिकांत पुणेकर, नाना फुलावरे, जयश्री पुणेकररेणुका भिंताडे शकुंतला चौधरीमाध्यम प्रतिनिधी दर्शन किराड पत्रकार अनिल चौधरी आदी उपस्थित होते.