आरोग्य तपासणीसारख्या उपक्रमातून सामान्य नागरिकांच्या हिताची काळजी हाच शिवसेनेचा प्राणवायू : डॉ. नीलम गोऱ्हे

215

पुणे प्रतिनिधी,

“गेली अनेक वर्षे कोथरूड परिसरातील नागरिकांसाठी शिवसेना हे एक ममत्वाचे आणि अभिमानाचे स्थान आहे. शिवसेना आणि कोथरूड यांचे एक घनिष्ट नाते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून दृढ आहे. त्यांच्या ९७ व्या जयंतीनिमित्त ‘प्रबोधन विचारधारा’ या व्यासपीठावरून कोथरूडचे लोकप्रिय प्रथम आमदार चंद्रकांत मोकाटे, माजी नगरसेवक योगेश मोकाटे अनेक कार्यक्रम आयोजित करीत असतात. आजही त्यांनी घेतलेल्या रक्तदान शिबिर आणि महाआरोग्य शिबिराचे आयोजन त्यांनी केले आहे. यामुळे सामान्य नागरिकांची काळजी घेऊन जनतेप्रती असलेली बांधिलकी शिवसेना कार्यकर्ते जपत आहेत. शिवसेनेचा हाच प्राणवायू आहे,” असे प्रतिपादन आज विधान परिषद उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी येथे केले.

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज कोथरूड परिसरातील शिवाजी पुतळ्याजवळ प्रबोधन विचार धारेच्यावतीने आणि मातोश्री जनाबाई बलभीम मोकाटे यांच्या स्मृती दिनानिमित्त वतीने रक्तदान शिबिर आणि महाआरोग्य शिबीर आयोजित केले होते.

त्यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी भेट दिली, या प्रसंगी त्या बोलत होत्या. त्यांनी आरोग्य शिबिरातील सहभागी नागरिकांशी, वयोवृद्ध नागरिकांशी संवाद साधला. रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांची भेट घेतली. डॉक्टर्स, शिवसेनेच्या महिला आघाडी आणि इतर महिलांशी त्यांनी आरोग्यविषयक संवाद साधला.

यावेळी माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख आदित्य शिरोडकर, शहरप्रमुख गजानन थरकुडे, नगरसेवक प्रशांत बधे, योगेश मोकाटे, संपर्क संघटीका स्वाती ढमाले, रिपब्लिकन पक्षाचे पुणे शहर पदाधिकारी मंदार जोशी, छायाताई भोसले, नितीन पवार, नंदू घाटे आणि शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. देवयानी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, लायन्स क्लब ऑफ कोथरूड आणि आधार ब्लड बँक या संस्थांनी या शिबिरासाठी विशेष सहकार्य केले.

पौड रोड येथील शिवसेना
शाखेच्या वतीने आयोजित आरोग्य शिबिराच्या ठिकाणीही डॉ. गोऱ्हे यांनी आज भेट दिली. यावेळी त्यांच्या समवेत सह संपर्क प्रमुख आदित्य शिरोडकर, शहर प्रमुख गजानन थरकुडे, माजी नगरसेवक जयदीप पडवळ, शाखा प्रमुख मारुती वर्वे, उपशाखा प्रमुख ज्ञानेश्वर दिघे आदी उपस्थित होते.
———