Thursday, April 24, 2025
Google search engine
Homeपश्चिम-महाराष्ट्रपुणेडॉ. कृणाल नंदकिशोर मेथा दिग्दर्शित " तू माझा होऊन ये " अल्बम...

डॉ. कृणाल नंदकिशोर मेथा दिग्दर्शित ” तू माझा होऊन ये ” अल्बम साँग सर्वत्र प्रदर्शित

पुणे प्रतिनिधि,

डॉ. कृणाल नंदकिशोर मेथा दिग्दर्शित ” तू माझा होऊन ये ” अल्बम साँग चा प्रदर्शन सोहोळा पुण्यातील KYTA हॉल मध्ये पार पडला. ह्या वेळी गाण्यातील कलाकार , दिग्दर्शक , निर्माते , गायक आणि तंत्रज्ञ तसेच अभिनेता सचिन गवळी , DYSP राजन जगदाळे , PSI अविनाश ढमे , ASI हनुमंत राजगे , अमालदार आशिष गायकवाड ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत दिमाखात पार पडला. तू माझा होऊन ये ह्या गाण्याचं दिग्दर्शन डॉ. कृणाल नंदकिशोर मेथा ह्यांनी केलं असून गाण्याची निर्मिती नंदकिशोर मेथा तर सह निर्मिती डॉ. संकेत ढेकळे ह्यांनी केली आहे. काजवा फेम अभिनेत्री सृष्टी अंबावले आणि शिवराया रं फेम अभिनेता डॉ. गौरव भोसले मुख्य भूमिकेत असून डॉ. करण राजगे, डॉ. नम्रता जगदाळे , हृषिकेश लेकावळे , अभिनंदन गायकवाड हे सह कलाकाराच्या भूमिकेत आहेत.
निलेश कटके लिखित तू माझा होऊन ये गाण्याला सुप्रसिद्ध गायक केवल वाळंज आणि सोनाली सोनावणे ह्यांनी स्वर बद्ध केलं आहे. राज शिंदे ह्यांनी नृत्य दिग्दर्शन केलं असून भागवत सोनावणे ह्यांनी रंगभूषा केली आहे. हे गाणं UNM PRODUCTION AND FILMS ह्या यूट्यूब चॅनल वर प्रदर्शित झालं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!