कोंढवा परिसरात जुगार अड्ड्यावर छापा २२ जण पोलिसांच्या जाळ्यात

623

कोंढवा प्रतिनिधी:~– पुणे शहर परिसरातील कात्रज कोंढवा रोड परीसरात परिसरात बेकायदेशीरपणे पत्र्याच्या शेडमध्ये काही इसम मटका जुगार खेळत व खेळवत असलेल्या मटका जुगार अड्ड्यावर पुणे शहर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला.
या कारवाईत पोलिसांनी २२ जणांनान ताब्यात घेऊन ५४ हजार ३०० रुपयेचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शनिवार (दि.११) रोजी केली आहे.कोंढवा पोलिस ठाणे हद्दीमध्ये बेकायदेशीरपणे कल्याण मटका जुगार खेळत व खेळवत असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पाळत ठेऊन पोलिसांनी छापा टाकला असता काही जण पैशांवर जुगार खेळताना आणि खेळवत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले त्यानुसार  पोलिसांनी २२ जणांना ताब्यात घेऊन रोख रक्कम, मोबाईल तसेच जुगाराचे साहित्य असा एकूण ५४ हजार ३०० रुपये किमतीच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी २२ जणांवर कोंढवा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार बंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे
ताब्यात घेण्यात आलेल्या २२ जणांना पुढील कारवाईसाठी कोंढवा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.ही सदरची कारवाई पोलीस आयुक्त, पुणे शहर रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त,पुणे शहर,संदिप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त गुन्हे.रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, अमोल झेंडे यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भरत जाधव तसेच पोलीस अंमलदार, मनिषा पुकाळे, अजय राणे, तुषार भिवरकर, इम्रान नदाफ, संदिप कोळगे, अमित जमदाडे या पथकाने यशस्वी केली आहे.