सनग्रेस शाळेला 10 कॉम्प्युटर्स प्रदान. वानवडीतील सर्व नागरिक डिजिटल साक्षर करणार : दिनेश होले

223

कोंढवा प्रतिनिधी 

“वानवडीत शिक्षण, आरोग्य यासह चांगल्या नागरी सुविधा नागरिकांना मिळाव्यात याकरिता मी सतत प्रयत्नशील आहे. सर्वानी संगणक प्रशिक्षित होऊन डिजिटली साक्षर व्हावे याकरिता गेली 20 वर्ष कटिबद्ध असून वानवडीतील 5000 नागरिकांना तर पुणे शहरातील 18,000 नागरिकांना संगणक साक्षर करण्यात यशस्वी झालो आहोत”, असे प्रतिपादन स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रसाद उर्फ दिनेश होले यांनी केले त्यांच्या विशेष प्रयत्नातून आय.टी कंपनीच्या सी.एस.आर निधीमधून संगणक प्रदान कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी मनोज वाघ,भरत वर्मा, विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी  सनग्रेस चे सचिव विजय पिल्ले, प्रतिष्ठान चे पदाधिकारी मनोज वाघ, भरत वर्मा, विनायक जांभुळकर, अतुल भुजबळ, विश्वस्त एड जीविता पिल्ले, उपमुख्यध्यापिका दिव्या मूर्ति उपस्थित होते.