Monday, June 16, 2025
Google search engine
Homeमुंबई/कोंकणरायगडझोपेचे सोंग घेणारे अधिकारी कधी जागे होणार...

झोपेचे सोंग घेणारे अधिकारी कधी जागे होणार…

गिरीश भोपी पनवेल

पदविक्रेत्यांच्या रस्त्यालगत होणारी कारवाई पनवेल महानगर पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून होताना अनेक वेळा दिसून आली मात्र मोठ – मोठी हॉटेल्स व्यवसायकांवर अश्या प्रकारची कारवाई का होत नाही? असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे. हॉटेल्स मालकांनी अनधिकृत शेड उभारून अतिक्रमण करून मनमानी कारभार केला असून ह्यांना पालिकेची कोणतीच भीती राहिलेली दिसून येत नाही. नागरिकांना चालण्यासाठी असलेले फुटपाथवर अतिक्रमण करून स्वतःची बॅनरबाजी केले असून अनधिकृत शेड उभारून देखील पनवेल महानगरपालिका अधिकारी ह्याकडे जाणूनबुजून काना डोळा करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र सर्वांच्या न्याय हक्कासाठी लढणारी क्रांतिज्योत महिला विकास फॉउंडेशन च्या ही बाब लक्षात आल्यामुळे अधिकाऱ्यांचे डोळे उघडण्याची वेळ आली असून फॉउंडेशन मार्फत पनवेल महानगरपालिका प्रभाग ड अधिकारी दीपक सिलकन यांना अनधिकृतरित्या फुटपाथची जागा व्यापणाऱ्या तसेच अनधिकृत शेड उभारणाऱ्या हॉटेल्स मालकांवर लवकरात लवकर कारवाई करावी ही मागणी करण्यात आली आहे जेणेकरून फुटपाथ वरून नागरिकांना ये- जा करण्यास सोयीस्कर होईल.
आता ह्या मागणीचा कितपत विचार करून झोपलेले अधिकारी कधी जागे होऊन यावर कारवाई करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!