श्वेता भोईर – उरण
मराठी भाषा आजच्या पिढीत जपली जावी, तिचा विस्तार व्हावा व यातून मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा याकरिता बांधिलकी प्रतिष्ठान तर्फे जागतिक मराठी भाषा दिन विशेष राज्यस्तरीय ऑनलाईन स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रात 14 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी या कालावधीत घेण्यात आली होती. या स्पर्धेस स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यामध्ये इयत्ता पहिली ते चौथी मुळाक्षरे पठण, इयत्ता पाचवी ते सातवी कविता पठण, इयत्ता आठवी ते बारावी आणि तेरावी ते पंधरावी स्वरचित काव्य लेखन, सर्वांसाठी स्वाक्षरी मोहिम, कर्णबधीर मतिमंद रत्नमाला विद्यामंदिर (कळंबोली, नवी मुंबई) येथील मुलांसाठी मुळाक्षरे लिखाण अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या.
या स्पर्धेचा निकाल 27 फेब्रुवारी रोजी ऑनलाईन जाहीर करण्यात आला. यामध्ये मुळाक्षरे पठण स्पर्धेत प्रथम क्रमांक स्वरा पाटील ( इयत्ता तिसरी, कामोठे, रायगड ), द्वितीय क्रमांक हरिप्रिया पाटील (इयत्ता दुसरी इचलकरंजी, कोल्हापूर), तृतीय क्रमांक अनुज पदमाई (इयत्ता पहिली, इचलकरंजी, कोल्हापूर) यांचा आला.
कविता पठण स्पर्धेत प्रथम क्रमांक मधुश्री शिंदे (इयत्ता पाचवी, कळंबोली, रायगड ), द्वितीय क्रमांक अजित वाघमारे ( इयत्ता पाचवी, पनवेल, रायगड ), तृतीय क्रमांक सार्थक शिंदे ( इयत्ता सहावी, गडद, पुणे) यांचा आला.
काव्य लेखन स्पर्धेत गट एकमधून प्रथम क्रमांक रोशनी दाभाडे ( अकरावी, राजगुरुनगर, पुणे ), द्वितीय क्रमांक सायली शिंदे ( आठवी, कळंबोली, रायगड ), तृतीय क्रमांक संदेश राजिगरे ( नववी, कळंबोली, रायगड ) व गट दोनमधून प्रथम क्रमांक साक्षी गलांडे (BAMS द्वितीय वर्ष, इंदापूर, पुणे ), द्वितीय क्रमांक चेतन बोराटे ( इंजिनिअरींग तृतीय वर्ष, कळंबोली, रायगड ), तृतीय क्रमांक अंकिता वाडकर (पंधरावी, घाटकोपर, मुंबई) यांचा आला.
स्वाक्षरी मोहिम स्पर्धेत प्रथम क्रमांक अमोल कदम (नोकरी, आकुर्डी, पुणे ), द्वितीय क्रमांक समीर म्हात्रे (शिक्षक, उरण, रायगड ), तृतीय क्रमांक अमीर मनियार (शिक्षक, उरुळी कांचन, पुणे) यांचा आला.
मुळाक्षरे लिखाण स्पर्धेत प्रथम क्रमांक यश भगत, द्वितीय क्रमांक ईश्वर कोरटकर, तृतीय क्रमांक शितल चव्हाण यांचा आला.
संपूर्ण स्पर्धेचे पर्यवेक्षण रायगड जिल्ह्यातील सुधागड एज्युकेशन सोसायटीतील जेष्ठ शिक्षणतज्ञ कुमुदिनी म्हात्रे यांनी केले. या स्पर्धेला कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, पुणे, नाशिक, अहमदनगर, ठाणे, रत्नागिरी, रायगड, मुंबई, नवी मुंबई या जिल्ह्यांमधून भरघोस प्रतिसाद मिळाला. एकूण 170 जणांनी सहभाग नोंदवला.
या स्पर्धेत बालपण इंग्लिश स्कूल, अहमदनगर येथील सोनाली मुंढे व शिवाजी मुंढे व जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळा, गडद, पुणे येथील नारायण करपे यांनी विशेष सहकार्य केले. त्याचबरोबर ऐश्वर्या पाटील व सुदर्शन कौदरे यांनी उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रसारक म्हणून विशेष मेहनत घेतली.
या बक्षीस वितरण समारंभात बांधिलकी प्रतिष्ठान अध्यक्ष पल्लवी निंबाळकर, उपाध्यक्ष स्वप्नील मुटके, उपसचिव श्वेता भोईर, खजिनदार विशाल कावरे, उपखजिनदार स्वप्नाली खांडेकर, सरचिटणीस गौरव शिंदे, पदाधिकारी सुदर्शन म्हात्रे, कोमल माने, अनिकेत जगताप, समीर जाधव उपस्थित होते.
इथून पुढे असेच उपक्रम घेऊन मराठी भाषेची गोडी सर्वांमध्ये अजून रुजावी आणि मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी अशा स्पर्धा घेण्यात येतील असा मानस बांधिलकी प्रतिष्ठान कमिटीने व्यक्त केला