पिल्लई एचओसी मॅनेजमेंट स्टडीज इन्स्टिट्यूट तर्फे रायगड व सिंधदुर्ग जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये जनजागृतीपर शिबिरे व्यावसायिक नीतिमूल्ये

246

व्यावसायिक नीतिमूल्य, “व्यवस्थापन शिक्षणाचे महत्त्व” याबाबत मार्गदर्शन

श्वेता भोईर  /गिरीश भोपी प्रतिनीधी,

पिल्लई एचओसी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च, रसायनी तर्फे “व्यावसायिक नीतिमूल्ये, व क्रॉस कटिंग समस्या” याबाबत जनजागृती तसेच “व्यवस्थापन शिक्षणाचे महत्त्व” याबाबत रायगड व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये “कम्युनिटी आउटरीच इनिशिएटिव्ह प्रोग्रॅम अंतर्गत” मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले आहेत. यावेळी डायरेक्टर डॉ. केतन वीरा, मार्केटिंग हेड गणेश शिंदे, पीआर व आउटरीच अधिकारी श्वेता भोईर यांचे मार्गर्शन लाभले. यावेळी आउटरीच अधिकारी उमैर खान, जेरोम नरोन्हा उपस्थित होते.

युवा पिढी हे देशाचे भविष्य आहे. व या पिढीला सर्वतोपरी सक्षम करणे महत्वाचे असून विद्यार्थ्यांना प्रोफेशनल व्यक्ती घडविण्यासोबतच आवश्यक असणारी नीतिमूल्ये त्यांच्यात रुजविणे काळाची गरज आहे आहे. सकारात्मक, कणखर नेतृत्व, सामाजिक बांधिलकी, विविधता आणि समावेशकता, जबाबदारी, पारदर्शकता, संवेदनशीलता, शाश्वतता, समानता, कृतज्ञता, हे सगळे मुद्दे महत्वाचे आहेत. यासाठी विद्यार्थ्यांमध्ये कौशल्ये विकसित करणे अतिशय गरजेचे आहे. पदव्युत्तर व्यवस्थापन शिक्षणामध्ये अर्थात एमएमएस किंवा एमबीए अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जात असून संज्ञानात्मक, भावनिक, सामाजिक, शारीरिक आणि आध्यात्मिक या मुख्य ५ गोष्टींवर लक्ष केंद्रित केले जाते.

हेच लक्षात घेत पिल्लई एचओसी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च, रसायनी तर्फे संपूर्ण रायगड जिल्ह्यातील तसेच सिंधुदुर्ग मधील महाविद्यालयांमध्ये मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांसोबतच संबंधित शैक्षणिक संस्थांमध्ये कार्यरत असणारे शिक्षक व कर्मचारी यांच्यासाठी देखील उपयुक्त असून या मार्गदर्शन शिबिरांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.