Saturday, June 14, 2025
Google search engine
Homeपश्चिम-महाराष्ट्रपुणेडॉ. रवींद्र खराडकर यांची आयईटीईच्या गव्हर्निंग कौन्सिल सदस्यपदी निवड

डॉ. रवींद्र खराडकर यांची आयईटीईच्या गव्हर्निंग कौन्सिल सदस्यपदी निवड

पुणे: जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनीरिंग आणि मॅनेजमेन्ट वाघोली कॅम्पसचे संचालक डॉ. रवींद्र खराडकर यांची इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअर्स (आयईटीई) नवी दिल्ली च्या गव्हर्निंग कौन्सिल सदस्यपदी नुकतीच निवड झाली आहे.

डॉ. खराडकर यांची निवड ही इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार अभियांत्रिकी क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल झाली आहे. त्यांच्या अनुभव आणि दूरदर्शी नेतृत्वामुळे ते शिक्षण आणि संशोधनात उत्कृष्टतेला चालना देण्यात आघाडीवर आहेत.
आयईटीई ही एक प्रसिद्ध व्यावसायिक संस्था आहे जी इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन्स आणि आयटीच्या क्षेत्रात काम करत आहे. गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य म्हणून, डॉ. खराडकर संस्थेची धोरणात्मक दिशा ठरवण्यात आणि उद्योग व्यावसायिक, संशोधक आणि शिक्षणतज्ञ यांच्यातील सहकार्याला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील.
डॉ. रवींद्र खराडकर यांनी या संधीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत म्हणाले की, “आयईटीईच्या गव्हर्निंग कौन्सिलमध्ये काम करण्याचा मला सन्मान वाटतो. मी संस्थेच्या वाढीसाठी आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार अभियांत्रिकी क्षेत्रातील नाविन्यपूर्णतेला चालना देण्यासाठी योगदान देण्यासाठी उत्सुक आहे.”
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल डॉ. खराडकर यांचे रायसोनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनचे अध्यक्ष श्री सुनील रायसोनी, रायसोनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनचे कार्यकारी संचालक श्री श्रयेश रायसोनी यांनी अभिनंदन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!