Friday, March 21, 2025
Google search engine
Homeताज्या घडामोडीश्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट मंडळाची प्राणप्रतिष्ठापना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक...

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट मंडळाची प्राणप्रतिष्ठापना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांच्या हस्ते श्

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १३१ व्या वर्षी गणेशोत्सवात अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. गणेश चतुर्थीला मंगळवार, दिनांक १९ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजून २३ मिनिटांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांच्या हस्ते श्रीं ची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. तर, मंदिरावरील विद्युतरोषणाईचे उद््घाटन सायंकाळी ७ वाजता होईल.

 
प्राणप्रतिष्ठापनेपूर्वी सकाळी ८.३० वाजता मुख्य मंदिरापासून हनुमान रथातून श्रीं ची आगमन मिरवणूक काढण्यात येणार आहे. आकर्षक फुलांचा रथ आणि त्यावर श्री हनुमानाच्या ४ मूर्ती लावण्यात येणार आहेत. मुख्य मंदिर, अप्पा बळवंत चौक, शनिपार चौक, टिळक पुतळा मंडईमार्गे उत्सव मंडपात मिरवणूक येणार आहे. देवळणकर बंधूचा चौघडा, गायकवाड बंधू सनई, दरबार बँड, प्रभात बँड, मयूर बँड आणि गंधाक्ष ढोल-ताशा पथकाचा मिरवणुकीत सहभाग असणार आहे. प्रतिष्ठापनेनंतर दुपारी १२ पासून भाविकांनी श्रीं च्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

* विषय : दगडूशेठ च्या अयोध्या श्रीराम मंदिर सजावटीचा उद््घाटन सोहळा
श्रीं ची प्राणप्रतिष्ठापना व आगमन मिरवणूक
* आयोजक : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ
* दिनांक : १९ सप्टेंबर २०२३, मंगळवार
* प्राणप्रतिष्ठापना वेळ : सकाळी १०.२३ वाजता, हस्ते : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे      सरसंघचालक डॉ.मोहन भागवत
* सजावट उद््घाटन वेळ : सायंकाळी ७ वाजता
* स्थळ : जय गणेश प्रांगण, उत्सवाची पारंपरिक जागा, बेलबाग चौकाजवळ, पुणे

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!