कोंढव्यातील प्रसिद्ध श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे रंगकाम सुरु

280

पुणे प्रतिनिधी ,

कोंढव्यातील सुप्रसिद्ध श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे संपूर्ण रंगकाम कै. मुरलीधर सादबा लोणकर यांच्या स्मरणार्थ अजित मुरलीधर लोणकर व परिवार यांच्या वतीने करण्यात येत आहे.

मंदिराच्या कळसाच्या रंगकामांचा शुभारंभ  सामाजभुषण पंढरीनाथ लोणकर , ह .भ.प. भगवान सादबा लोणकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी दादू गोते, आप्पासो रोकडे, दत्ताआबा लोणकर, सुदाम वांजळे, भालचंद्र काटे, राजेंद्र लोणकर, मनोहर लोणकर, विजय पवार, गणेश कवडे, नारायण लोणकर, नंदाताई लोणकर, सुभाष कापरे, सचिन कामठे,विशाल जाधव, प्रशांत लोणकर, संतोष गोरड आदी उपस्थित होते.