राजेंद्र भिंताडे यांची हवेली तालुका सरचिटणीसपदी निवड

285

उंड्री, पुणे प्रतिनिधी

उंड्री पिसोळी तसेच हवेली तालुक्यातील समाजसेवक तसेच नागरिकांच्या सेवेस 24 तास सदैव तत्पर असणारेआणि नागरिकांच्या हाकेला धावून जाणारे आणि संपूर्ण पंचक्रोशीत जनसेवक प्रसिद्ध असणारे  भाजपाचे युवा नेते राजेंद्र भिंताडे यांच्या कार्याची दखल घेऊन भारतीय जनता पक्षाने मध्य हवेली तालुका भाजप सरचिटणीसपदी उंड्री (ता. हवेली) येथील राजेंद्र भिंताडे यांची नियुक्ती करण्यात आली. भाजपचे जिल्हा अध्यक्ष वासुदेव काळे आणि अध्यक्ष संदीप हरपळे यांच्या हस्ते भिंताडे यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. याप्रसंगी भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सरिचटणीसपदी निवड झाल्यानंतर भिंताडे म्हणाले की, भाजपची ध्येय-धोरण तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचविणार आहे. तसेच, शासकीय योजनांचा लाभ सामान्यांना मिळवून देण्यासाठी प्राधान्यक्रमाने प्रयत्न असणार आहे, असे त्यांनी सांगितले.
भाजपाचे जिल्हाध्यक्ष वासुदेव नाना काळे, संदिप हरपळे यांच्या हस्ते राजेंद्र भिंताडे यांना सरचिटणीसपदाचे नियुक्ती पत्र देण्यात आले.