विविध उपक्रमांनी अजितदादांचा वाढदिवस उत्सहात साजरा

210

अनिल चौधरी , पुणे

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ,अर्थमंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उंड्री येथील मनपा शाळेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देशाला दिलेले संविधान याचे सर्व विद्यार्थ्यांकडून वाचन करून घेण्यात आले. तसेच बालमित्रांना खाऊ बिस्कीटचे पुडे , चॉकलेट्स, केक वाटून करण्यात आला. तसेच शाळेतील शिक्षकांना गुरुपौर्णिमेनिमित्त  शाल श्रीफळ व तसेच फुलांचे झाड प्रत्येकी देण्यात येऊन त्यांचा  यथोचित सत्कार करण्यात आला. अशाप्रकारे विविध उपक्रमांनी अजित दादा पवार यांचा वाढदिवस मोठ्या उत्सहात उंड्रीमध्ये  साजरा करण्यात आला. 

 या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या  पुणे जिल्हा महिला उपाध्यक्ष. सौ जयश्रीताई शशिकांत पुणेकर यांनी केले होते. या कार्यक्रमासाठी पक्षाचे शहर उपाध्यक्ष श्री वसंतराव कड, तालुका अध्यक्ष प्राची ताई देशमुख तसेच शाळेच्या प्रिन्सिपल अलका ननावरे  सुवर्णा सिद्ध वाडकर  थोरात सर गणेशा अनभुले , विकास बांगर , नामदेव जगधने ,नामदेव खाडेकर , प्रियंका लोंढे ,अमोल दळवे तसेच श्री शशिकांत पुणेकर, सौ.साक्षी पुणेकर, सत्यम पुणेकर, संकेत पुणेकर, चेतना आगम.. सर्व उंड्री  ग्रामस्थ व विद्यार्थी वर्ग या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. याप्रसंगी आभार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष वसंतराव कड यांनी मानले..