पुणे प्रतिनिधी,
शनिवार रोजी मनपा शाळा उंड्री येथे मा.राष्ट्रपती ए.पि.जे.अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथी दिना निमित्त आदरांजली वाहण्यात आली. तसेच नवीन बदली होऊन आलेल्या म.न.पा शिक्षकांचे स्वागत व जि.प.शिक्षकांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम घेण्यात आला. शिक्षकांनी केलेल्या कामाची पोचपावती म्हणून सर्व शिक्षकांचा उंड्री गावातील मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मा.सरपंच सुभाष बापू टकले हे लाभले तर जि.प.सदस्या स्वाती ताई टकले, मा.नगरसेवक राजेंद्र भिंताडे,राष्ट्रवादी पुणे जिल्हा उपाध्यक्ष जयश्री पुणेकर, राष्ट्रवादी पुणे जिल्हा उपाध्यक्ष वसंतजी कड ,उत्तम फुलावरे ,शशिकांत पुणेकर ,कुंडलिक पुणेकर, अनिल शेठ कानडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सुभाष टकले व राजेंद्र भिंताडे आणि इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले व शाळेची माहिती दिली. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शिक्षकांचा सत्कार घेण्यात आला.निरोप समारंभ प्रसंगी बदली होऊन गेलेले कुंभारकर सर,शिंदे सर,आठवले मॅडम यांनी आपले अनुभव व मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री नामदेव जगधने सर यांनी केले व विकास बांगर यांनी आभार मानले.
या कार्यक्रमाला मुख्याध्यापिका अलका ननावरे उपशिक्षीक सुवर्णा सिदवाडकर,प्रियांका लोंढे, उपशिक्षक नामदेव खांडेकर, अमोल दळले, घनश्याम अनभुले,गोरख थोरात,विकास बांगर, शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.