या गाण्याचा संगीत अनावरण सोहळा नुकताच ठाण्यातील आय लिफ बँक्वेट्स येथे पार पडला. या सोहळ्याला संगीतकार क्रेटेक्स, गायक श्रेयस, ‘तांबडी चांबडी’ गाण्याची संपूर्ण टीम तसेच हास्यजत्रा फेम पृथ्विक प्रताप, स्टँडप कॉमेडियन अनिश गोरेगांवकर, भाडिपा टीम आणि सागरिका म्युझिक चैनल हेड सागरिका दास असे नामवंत मान्यवर उपस्थित होते.
‘तांबडी चांबडी’ गाण्याविषयी संगीतकार क्रेटेक्स सांगतो, “माझा आनंद गगनात मावत नाही आहे. माझ स्वप्न होत की माझं गाण स्पिनिंग रेकॉर्डस वरती कधीतरी याव. ज्या रेकॉर्ड लेबलवरती जगभरातील डेव्हिड ग्वेट, मार्टिन गॅरिक्स, अफ्रोजॅक, डिमिट्री व्हेग्स एंड लाइक माइक, हार्डवेल, स्टीव्हओकी अश्या सुप्रसिद्ध कलाकारांची गाणी या आधी प्रदर्शित झाली आहेत. आणि आता या विविध भाषेमधील गाण्यांमध्ये आपलं मराठी गाण प्रदर्शित होण. माझ्यासाठी ही स्वप्नपूर्ती आहे. या गाण्याच्या ऑडियोला भारतातच नव्हे तर जगभरात प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आम्ही व्हिडीओच्या स्वरूपात गाण तुमच्यासाठी घेवून आलो आहोत. आणि आता लवकरच मी परदेशात मराठी गाण्याचे शो करत आहे. प्रेक्षकांच प्रेम कायम असच राहो. आणि मराठी भाषा, मराठी गाणी देशात नव्हे तर परदेशातही वाजू दे हीच सदिच्छा. येत्या १ सप्टेंबरला पुण्यातील बॉलर येथे मराठीतील सर्वात मोठा शो होणार आहे. तेव्हा पुणेकर आणि सर्व प्रेक्षकांनी जरुर या शो ला या.”