कोंढवा प्रतिनिधी,
पुणे शहर आणि ग्रामीण भागात धुमाकूळ घालणाऱ्या ३ चोरट्यांना कोंढवा पोलीसांनी अटक केली आहे. या चोरट्यांनी अनेक दुचाकी चोरल्या होत्या. पोलिसांनी त्यांच्याकडून 20 चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत.
कोंढवा पोलीस ठाणे हद्दीतील वाहन चोरीच्या घटनांना आळा बसवण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेजचा बारकाईने अभ्यास केला. याच अभ्यासाच्या आधारे पोलिसांना चोरट्यांचा ठाव घेतला.
पोलिसांनी चोरट्यांना हांडेवाडी येथून अटक केली. अटक केलेल्या चोरट्यांना कोंढवा, हडपसर, भारती विद्यापीठ आणि इतरही पोलीस ठाण्यांमध्ये दाखल केलेले गुन्हे उघडकीस आले आहेत.
पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे पुणे शहरातील नागरिकांना मोठी दिलासा मिळाला आहे.
वरिल कामगिरी ही अमितेशकुमार पोलीस आयुक्त, रंजनकुमार शर्मा सह पोलीस आयुक्त, मनोज पाटील, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, आर राजा, पोलीस उप आयुक्त परि.०५ धन्यकुमार गोडसे, सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, विनय पाटणकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांच्या मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे, पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे, पोलीस अंमलदार सतिश चव्हाण, निलेश देसाई, विशाल मेमाणे, गोरखनाथ चिनके, सागर भोसले, संतोष बनसुडे, शाहीद शेख, लक्ष्मण होळकर, सुरज शुक्ला, सुजित मदन या पथकाने केली आहे.