Saturday, June 14, 2025
Google search engine
Homeपश्चिम-महाराष्ट्रपुणेपरिवहन वाहनासाठी नोंदणी क्रमांकाची नवीन मालिका

परिवहन वाहनासाठी नोंदणी क्रमांकाची नवीन मालिका

पुणे : पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे लवकरच परिवहन वाहनांसाठी ‘एलएक्स’ ही नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे. या मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक तीनपट शुल्क भरून चारचाकी वाहनांसाठी राखून ठेवण्यासाठी तसेच उर्वरित क्रमांक परिवहन वाहनांसाठी ठेवण्याबाबत आगाऊ अर्ज स्वीकारण्याची व लिलाव कार्यपद्धतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

नव्याने सुरु होणाऱ्या परिवहन मालिकेतील आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहित तीनपट शुल्क भरून हवे असतील अशा वाहन मालकांनी ९ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ ते दुपारी २.३० वाजेपर्यंत विहित नमुन्यात अर्ज करावा. उर्वरित आकर्षक नोंदणी क्रमांक परिवहन वाहनांसाठी आरक्षित करण्यासाठी १० ऑक्टोबर रोजी सकाळी ११ ते दुपारी २.३० वा. विहित नमुन्यात अर्ज सादर करावा, असे पिंपरी चिंचवडचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!