Thursday, April 24, 2025
Google search engine
Homeमराठवाडाछत्रपती संभाजीनगर येथील वनपरीक्षेत्र कार्यालय नूतन इमारतीचे उदघाट्न सोहळा संपन्न

छत्रपती संभाजीनगर येथील वनपरीक्षेत्र कार्यालय नूतन इमारतीचे उदघाट्न सोहळा संपन्न

छत्रपती संभाजीनगर:(बालाजी सिलमवार ):-प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर येथील वनपरिक्षेत्र(प्रा)अधिकारी कार्यालयाच्या उद्घाटनाला मुहूर्त आज दिनांक १४ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता नवीन इमारतीचे अनावरण सोहळा वनविभागाच्या विविध अधिकाऱ्याच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या
उद्घाटन सोहळ्यास मा.श्री प्रमोदचंद लाकरा वनसंरक्षक (प्रा.)छत्रपती संभाजीनगर यांच्या प्रमुख उपस्थितीत,छत्रपती संभाजीनगरचे उपवनसंरक्षक (प्रा.)मा.श्री सूर्यकांतजी मंकावार,यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले. यावेळी सामाजिक वनीकरण विभागीय विभागाचे वनअधिकारी,श्रीमती.कीर्ती जमदाडे मॅडम,श्री मोहन नाईकवाडे,विभागीय वनअधिकारी वन्यजीव छत्रपती संभाजीनगर,श्रीमती कल्पना टेमगिरे मॅडम (नियोजन)छत्रपती संभाजीनगर,आदी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या प्रमुख उपस्थितीत नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन सोहळा पार पडले.सदर इमारतीचे बांधकाम हे कॅम्पा योजने मधील एकूण अनुदान रक्कम ३६.४२ रु.लक्षमध्ये करण्यात आले.यावेळी छत्रपती संभाजीनगरचे सुशील नांदवटे वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रा) छत्रपती संभाजीनगर यांनी समस्त अधिकाऱ्यांचे आभार मानले. यावेळी वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या अधिनस्त सर्व वनमजूर,वनरक्षक आणि वनपाल विभागाचे समस्त अधिकारी कर्मचारी बांधवांचीही उपस्थित होती.या नूतन प्रशासकीय इमारत तत्कालीन कर्तव्यदक्ष वनपरीक्षेत्र अधिकारी दादा तौर यांच्या कार्यकाळात सुरु झाले होते,या अनावरण बद्धल विभागाच्या कर्मचाऱ्यामध्ये समाधान व्यक्त होत आहे.
000000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!