अनिल चौधरी, पुणे:
विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे त्यामुळे सर्वच पक्षातील उमेदवार निवडणूकीसाठी सज्ज झाले आहेत. पुण्यातील हडपसर विधानसभेसाठी कॉंग्रेस पक्षाचे पुणे शहर उपाध्यक्ष हाजी उस्मान तांबोळी यांनी पक्षाकडे उमेदवारी साठी मागणी केली आहे.
गेली चाळीस वर्षांपासून काँग्रेस पक्षामध्ये सक्रिय राहुन पक्ष वाढीसाठी पक्षाचा विचार लोकांच्या घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी तांबोळी यांनी योगदान दिले आहे.
नऊ वर्षापासून काँग्रेस पुणे शहर उपाध्यक्ष म्हणून कार्यरत असलेल्या उस्मान तांबोळी यांचे सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात भरीव योगदान आहे. महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रमांचे आयोजन, वंचित घटकांसाठी विविध सामाजिक उपक्रम घेऊन त्यांना योग्य न्याय देण्याची भूमिका आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी, जेष्ठ नागरिकांनासाठी नेञ तपासणी व मोफत चष्मे वाटप, निराधार व अपंग गरजू महिलांना मदत व साहित्य वाटप असे सातत्याने विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात याची पोहच पावती म्हणून पक्षाचे विधानसभचे तिकीट द्यावे अशी भावना तांबोळी यांनी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्रात 11 टक्के मुस्लिम लोकसंख्या असूनही, गेल्या चार ते पाच लोकसभा निवडणुकीत फक्त एक मुस्लिम उमेदवार उभा करण्यात आला आहे. धुळे, मालेगाव, भिवंडी, अकोला, औरंगाबाद आणि नांदेड यांसारख्या मुस्लिमबहुल मतदारसंघांमध्ये अनेकदा मुस्लिम प्रतिनिधित्वाचा अभाव असतो. भेदभाव करणारे कायदे आणि मुस्लिमांविरुद्ध मॉब लिंचिंगच्या वाढत्या घटनांमुळे मुस्लिम समुदायांमध्ये अधिक राजकीय जागरूकता आणण्याची गरज आहे.
पुण्यातील हडपसर मतदारसंघ जागा युतीच्या जागावाटपात कळीचा ठरत असल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे आघाडीत देखील या जागेवरून ओढाताण सुरु आहे. भाजपा-सेनेत हडपसरवरून असा तिढा निर्माण झाला असताना आघाडीतही काही आलबेल नाही. हडपसरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढणार असल्याचं अजित पवार यांनी आधीच जाहीर केलंय. काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना हा निर्णय मंजूर नाही. ही जागा काँग्रेसला मिळावी यासाठी गरज पडल्यास मोर्चा काढण्याची तयारी इथल्या इच्छुकांनी चालवलीय. तेव्हा युती असो वा आघाडी विधानसभेसाठीचं जागावाटप ही दोन्हीकडची डोकेदुखी आहे. ही प्रक्रिया जितकी सहजतेनं पार पडेल तितकं दोघांसाठी फायद्याचं आहे. मात्र जेव्हा प्रश्न इच्छुकांच्या मनसुब्यांचा येतो तेव्हा अशा तिढ्यातून मार्ग काढणं पक्षाच्या नेत्यांसमोर मोठं आव्हानांचं असतं.