नामदेव श्रीमांगली ,मुखेड प्रतिनिधी.
महाराष्ट्र गोल्ला गोल्लेवार समाज सेवा संघाच्या वतीने नुकतच नव्याने निवड झालेल्या अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद सलग्णित मुखेड तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष, सचिव व सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी तसेच कार्यकारणी सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
तालुका पत्रकार संघाचा एक वर्षाचा कार्यकाळ संपल्यामुळे नुतन कार्यकारणी गठीत करण्यात आली.नव्याने निवड झालेल्या मुखेड तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष महेताब शेख, सचिव राजेश बंडे,जिल्हा संघटक अॅड संदीप कामशेट्टे,सल्लागार जेष्ठ पत्रकार यशवंतराव बोडके, कार्याध्यक्ष नामदेव श्रिमंगले, उपाध्यक्ष दत्तात्रय कांबळे, उपाध्यक्ष रामदास पाटील, संघटक संजय कांबळे, कोषाध्यक्ष जगदीश जोगदंड, वार्ताहार जैनोदीन पटेल, विठ्ठल पा.येवतीकर, राजु रोडगे या सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी व कार्यकारणी सदस्यांचा महाराष्ट्र गोल्ला गोल्लेवार समाज सेवा संघाच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आले.यावेळी समाजाचे जेष्ठ नेते रामचंद्र चौलवाड, अंकुश माचेवाड,सरपंच प्र.पंढरी कोंडेवाड, दतात्रय निम्मलवाड, माजी सरपंच पिराजी वासमवाड, उपसरपंच सुरेश नुकूलवार, रामकीशन पैलवाड, केशव चौलवाड, बालाजी जिल्लेवाड, रमेश सिंघनवाड, चंद्रकांत वाडीकर, संभाजी शस्त्रमोड, बाळू वाडीकर पवन शिरबतळ, मारोती पा.वाडीकर, रामदास पैलवाड, देविदास नुकूलवाड, बालाजी निम्मलवाड सह महाराष्ट्र गोल्ला गोल्लेवार समाज सेवा संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.