पुणे आंतरधार्मिक समाज, धार्मिक स्वातंत्र्य आणि शांततेसाठी समर्थन केल्याबद्दल एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल विश्वनाथ कराड यांना या वर्षी अमेरिकेतील वॉश्गिटन डीसी येथे आयआरएफ बिल्डर्स फोरम आणि रॉजर विल्यम्स आयआरएफ पुरस्कारांमध्ये प्रतिष्ठित २०२५ चा ‘ग्लोबल बिझनेस अँड इंटरफेथ पीस गोल्ड मेडल’ पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले.
अमेरिकेतील रिलिजस लिबर्टी अँड बिझनेस फाउंडेशनच्या वतिने नुकतेच अमेरिकेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रूबियो यांच्या हस्ते डॉ.राहुल कराड यांचा सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी रिलिजस लिबर्टी अँड बिझनेस फाउंडेशनचे अध्यक्ष ब्रायन जे ग्रिम उपस्थित होते.
यावेळी सत्काराला उत्तर देताना डॉ. राहुल विश्वनाथ कराड म्हणाले “ सकारात्मक शांततेच्या तत्वांवर बांधलेला समाज लोकांना आधार देतो आणि भविष्यातील संकटांविरूद्ध लढण्याची ताकद देतो.अशा वेळेस उज्ज्वल भविष्याच्या शोधात शांती, ज्ञानाच्या देवाणघेवाण आणि मानव कल्याणासाठी सर्वांनी मिळून कार्य करावे. हा पुरस्कार स्विकारतांना खूप मोठी जबाबदारी पडली आहे.”
“विद्यार्थ्यांना वैश्विक नागरिक बनविण्यासाठी डब्ल्यूपीयूत पीस स्टडीचा समावेश केला आहे. यातून वि अत्याधुनिक शैक्षणिक अनुभव प्रदान करणे, संवाद साधणे, रचनात्मक, शांततापूर्ण उपयांसाठी कार्य करणे आणि ज्ञान व कौशल्यांनी सुसज्य आहे. तसेच डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी जगातील सर्वात मोठ्या वैश्विक शांतता डोम ची निर्मिती करून यातून विश्वशांतीचा संदेश दिला जात आहे.”
यावेळी देश विदेशातील नावाजलेल्या प्रतिष्ठित नागरिकांचा सन्मान करण्यात आला.