Homeताज्या घडामोडीगेल्या सोळा तासांपासून कोंढवा गावठाणातील वीज गायब ; नागरिक त्रस्त

गेल्या सोळा तासांपासून कोंढवा गावठाणातील वीज गायब ; नागरिक त्रस्त

कोंढवा प्रतिनिधी:-

काल संध्याकाळी (६मे ) संध्याकाळी ७ वाजल्यापासून कोंढवा खुर्द भैरवनाथ आळी परिसरातील वीज डीपीला अचानक आग लागल्याने वीज पुरवठा खंडित झाला आहे , यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वास्तविक डीपीला आग लागलं लागल्याचे लक्षात येताच नागरिकांनी त्वरित वीज मंडळाच्या अधिकाऱ्याना संपर्क केला. असे असतानां देखील गेल्या सोळा तासांपवून नागरिक अंधारात असून उन्हाळ्याचे दिवस असल्याने परिसरातील नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. तसेच वीज नसल्याने उंच इमारतीतील नागरिकांना पाणी नसल्याने दैनंदिन कामे रखडले आहेत.
कोंढवा वीज मंडळाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांनी केबल जळाल्याने हा प्रॉब्लेम झाला असून अजून काही तास लागतील असे सांगितले .तर नागरिकांना उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे नागरिकांनी सांगितले . वास्तविक वीज मंडळाच्या कर्मचाऱ्यानी युद्ध पातळीवर काम करून नागरिकांच्या समस्येवर त्वरित उपाययोजना करावयाच्या असतात परंतु कोंढवा वीज विभागातील कर्मचारी नागरिकांच्या समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments