वानवडी प्रतिनिधी
साळुंखे विहार हा रस्ता प्रचंड गजबलेला रस्ता. या रस्त्यावरून जायचे म्हणजे एक दिव्यच होते.सकाळ संध्याकाळी या रस्त्यावर हातगाड्या लावून भाजी विक्रेते ,फळभाजी वाले रस्त्यावर जवळपास निम्मा भाग अतिक्रमण करून अडविल्याने वाहनांना अर्धाच रस्ता वापरायला मिळालायचा परिणामी या रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी व्हायची याबाबत अनेक नागरिकांनी हा रस्ता अतिक्रमण मुक्त करा अशा तक्रारी पुणे मनपा कडे केल्या होत्या. तसेच काही नागरिकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील कारवाई बाबत पत्रे दिली होती. या सर्वांची दखल घेऊन पुणे मनपाच्या अतिक्रमण विभागाने ३७ टपऱ्या व हातगाड्यांवर मोठी कारवाई केली.
पुणे महापालिका सहायक आयुक्तांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.. या कारवाईत ८ हातगाड्या, १७ पथारी आणि इतर १२ अशा एकूण ३७ अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली.

ही धडक कारवाई क्षेत्रीय अतिक्रमण निरीक्षक संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण निरीक्षक श्रीमती मेघा राऊत, सहायक अतिक्रमण निरीक्षक रवी जाधव यांनी पार पाडली. कारवाईसाठी १३ बिगारी सेवक, १२ एम.एस.एफ. (MSF) जवान आणि २ ट्रकचा ताफा तैनात करण्यात आला होता. या कारवाईमुळे साळुंखे विहार परिसरातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. तर. भविष्यात हातगाड्या मालकांनी येथे गाड्या लावू नये अन्यथा मोठी कारवाई पुन्हा केली जाईल अशी तंबी देखील त्यांना देण्यात आली.



