जनस्वाक्षरी मोहिमेद्वारे जनजागृती
कोंढवा प्रतिनिधी
उन्हाळ्याच्या झळा तीव्र होत असतानाच पुण्यातील कोंढवा परिसरात पाण्याचा प्रश्न अधिकच गंभीर झाला आहे. अपुरा पाणीपुरवठा आणि कमी दाबाने येणारे पाणी यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांच्या सोबतीला आता भारतीय जनता पक्षाचे (भाजपा) स्थानिक कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. कोंढव्यातील ही तहान मिटवण्यासाठी आता भाजपने थेट मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
पाणी कपातीचा रोष आणि वाढती तक्रार
गेल्या काही दिवसांपासून कोंढवा खुर्द परिसरात पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. शिवनेरी नगरला रोज फक्त पावनेदोन तास पाणी पुरवठा होत आहे.अनेक सोसायट्यांना टँकरवर अवलंबून राहावे लागत असून, टँकर माफियांच्या वाढत्या मनमानीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. महापालिकेकडे वारंवार तक्रार करूनही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये मोठा संताप आहे.
भाजपचा आक्रमक पवित्रा
या पार्श्वभूमीवर, भाजप कार्यकर्त्यांनी लष्कर पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्याना वारंवार तक्रारी करून सुद्धा काहीही उपयोग झाला नाही. यावेळी कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. “कोंढवेकरांची तहान मिटे पर्यंत आम्ही शांत बसणार नाही,” अशी भूमिका भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. यामध्ये भाजपाचे युवा नेते प्रतीक लोणकर, अमर गव्हाणे, सतिश शिंदे, सुप्रिया शिंदे, सतपाल पारगे यांनी प्रशासनला कडक इशारा दिला आहे. आमदार योगेश टिळेकर यांच्या मार्गदर्शनात त्यांनी जनस्वाक्षरी अभियान सुरु आहे. या स्वाक्षरी मोहिमेला नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत असून हजारो नागरिकांनी कोंढव्याचा पाणी प्रश्न मिटावा म्हणून नागरिक मोठ्या प्रमाणात स्वाक्षरी करत आहेत.
कार्यकर्त्यांच्या प्रमुख मागण्या:
शिवनेरी नगर भागातील बांधून तयार असलेली पाण्याची टाकी पूर्ण क्षमतेने सुरु करावी.
अप्पर भागातील कोंढवा भागासाठी असलेली पाण्याची टाकी त्वरित सुरु करावी
कोंढवा परिसरात पुरेसा आणि समन्यायी पाणीपुरवठा व्हावा.
अपुरा दाबाने पाणी येणाऱ्या भागातील तांत्रिक दोष त्वरित दूर करावेत.
टँकर माफियांच्या मनमानीवर अंकुश लावावा.
प्रलंबित असलेल्या ‘समान पाणीपुरवठा योजने’ची कामे तातडीने पूर्ण करावीत.
आंदोलनाचा इशारा
जर येत्या काही दिवसात पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही, तर महापालिका आयुक्तांच्या दालनासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजप कार्यकर्त्यांनी दिला आहे. या आंदोलनामुळे कोंढव्यातील राजकारण आणि पाणी प्रश्न दोन्ही चांगलेच तापण्याची चिन्हे आहेत.
”प्रशासन केवळ आश्वासने देत आहे, पण प्रत्यक्ष जमिनीवर नागरिक पाण्यासाठी वणवण करत आहेत. भाजप कार्यकर्त्यांनी आता कंबर कसली असून आम्ही हा प्रश्न मार्गी लावल्याशिवाय मागे हटणार नाही.” असेही स्थानिक भाजप पदाधिकारी प्रतीक लोणकर, अमर गव्हाणे, सतिश शिंदे, सातपाळ पारगे, अभिषेक सोनावणे, श्रीकांत लोणकर, सनी लोणकर, रोहित देवकुळे, गणेश माळी, हर्षल गोते, व सुप्रिया शिंदे यांनी दिला आहे.



