Homeपश्चिम-महाराष्ट्रपुणेपुणे आयडॉल २०२६ ची महाअंतिम फेरी १० मे रोजी बालगंधर्व येथे

पुणे आयडॉल २०२६ ची महाअंतिम फेरी १० मे रोजी बालगंधर्व येथे

५६० स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग; विविध क्षेत्रातील मान्यवरांना ‘व्हॉइस ऑफ चॉईस’ विशेष पुरस्कार प्रदान करण्यात येणार

पुणे | प्रतिनिधी

सोमेश्वर फाउंडेशन, पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय ‘पुणे आयडॉल २०२६’ या लोकप्रिय गायन स्पर्धेची महाअंतिम फेरी रविवार, दि. १० मे २०२६ रोजी सायंकाळी ५ ते रात्री ८ या वेळेत बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे संपन्न होणार आहे.

गेल्या २४ वर्षांपासून सातत्याने आयोजित करण्यात येणाऱ्या या स्पर्धेमुळे अनेक नवोदित आणि स्थानिक गायक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. यंदाच्या स्पर्धेला राज्यभरातून तब्बल ५६० स्पर्धकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, अंतिम फेरीत निवड झालेल्या स्पर्धकांकडून सुरेल गायनाची मेजवानी रसिकांना अनुभवायला मिळणार आहे.

कार्यक्रमामध्ये समाजसेवेबरोबरच गायनाचा छंद जपणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींना ‘व्हॉइस ऑफ चॉईस’ विशेष पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. यामध्ये पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम, सुप्रसिद्ध हृदय रोग विशेषज्ञ डॉ. जगदीश हिरेमठ, नगरसेविका सौ. सपना आनंद छाजेड , फरासखाना पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे तसेच वरिष्ठ पत्रकार यशपाल सोनकांबळे यांचा समावेश आहे.

यावेळी समारोप प्रसंगी प्रसिद्ध गायक जितेंद्र भुरूक यांचा ‘गीतों का सफर’ हा विशेष संगीत कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून, रसिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments