Homeताज्या घडामोडीदोन कारच्या धडकेत एकाचा मृत्यू, चार जखमी

दोन कारच्या धडकेत एकाचा मृत्यू, चार जखमी

फेटरी-खडगाव बायपास मार्गावरील घटना

अनिकेत उमरेडकर प्रतिनिधी 

कळमेश्वर : फेटरी ते खडगाव गोंडखैरी बायपास मार्गावर दोन कार समोरासमोर धडकल्याने ११ मे रोजी सायंकाळी ५.३० वाजताच्या दरम्यान अपघात झाला. या अपघातात इरफान उल्ला खान (५२, रा. बंगाली पंजा, नागपूर) यांचा मृत्यू तर चार जण जखमी झाले.

झायलो कार क्रमांक एमएच १४ डीडीएक्स १६५३ व ईरटीगा कार क्रमांक एमएच ४९ एई २९२४ या दोन कारमध्ये धडक झाली. त्यात खान यांचा मृत्यू झाला, तर चार जखमींना नागपूरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी कळमेश्वर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. तपास ठाणेदार मनोज काळबांडे, उपनिरीक्षक प्रवीण घोडाम करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments