कोंढव्यात कर्ज मंजूर करून देण्याच्या अमिषाने तरुणाची फसवणूक

1026
भूषण गरुड :
कोंढवा परिसरात खाजगी नामांकित फायनान्स कंपनी कडून वीस लाख रुपयाचे कर्ज मंजूर करून देण्याच्या आमिषाने सुदर्शन कुमार (वय 35, रा. हांडेवाडी) या तरुणाची 34 हजार पाचशे रुपयाची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी अनोळखी इसमाविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपीने सुदर्शन यास मोबाईलवर संपर्क साधून फायनान्स कंपनी कडून कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून आरोपीने कर्ज मंजूर करून देण्यासाठी जीएसटी सह प्रोसेसिंग फी ची रक्कम बँक खात्यात भरण्यास सांगितले. पैसे भरल्यानंतर ही कर्ज न मिळाल्याने. कोंढवा पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध फिर्याद देण्यात आली. 
पुढील तपास कोंढवा पोलीस करीत आहेत.