Homeताज्या घडामोडीकात्रज मध्ये खोलीत आढळले दोन तरुणांचे मृतदेह; पेस्ट कंट्रोल केल्यामुळे दोघांचा बळी...

कात्रज मध्ये खोलीत आढळले दोन तरुणांचे मृतदेह; पेस्ट कंट्रोल केल्यामुळे दोघांचा बळी गेल्याची शक्यता

भूषण गरुड पुणे
खोलीत झालेले ढेकूण घालवण्यासाठी केलेल्या पेस्ट कंट्रोलमुळे अजय बेलदरे(रा.जळगाव) व अनंत खेडकर(रा.बुलढाणा) कॅन्टीन कर्मचाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला. ही घटना भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.

भारतीय विद्यापीठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णू पवार यांनी याबाबत माहिती दिली. पुण्यातील एका महाविद्यालयाच्या कॅन्टीनमध्ये हे दोन तरुण काम करीत होते. हॉटेल मालकाने त्यांना राहण्यासाठी एक खोली दिली होती. या खोलीत ढेकुन झाल्याने तीन दिवसांपूर्वी खोलीत पेस्ट कंट्रोल करून खोली पूर्णपणे पॅकबंद करण्यात आली होती. त्यानंतर ते दोघे जण तीन दिवस एका मित्राच्या घरी जाऊन राहिले होते. मंगळवारी रात्री ते परत आपल्या खोलीवर येऊन झोपले.

बुधवारी बराच वेळ झाला तरी कामावर न आल्याने कॅन्टीन मॅनेजरने त्यांच्या खोलीवर येउन पाहीले असता दरवाजा आतून बंद होता. खिडकीतून पाहिले असता दोघेजण ही झोपलेले आढळून आले. त्यानंतर कॅन्टीन मॅनेजरने दरवाजा तोडून आत मध्ये प्रवेश केला आणि दोघांना रुग्णालयात दाखल केले. तपासणी अंती डॉक्‍टरांनी दोघांनाही मृत घोषित केले. दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आले असून सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यवंशी पुढील तपास करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments