विद्यार्थ्यांच्या कल्पकतेने सजला “अँक्मे फॅशन शो”.

680

मल्हार  न्यूज

सांगवी येथील बाबुरावजी घोलप महाविद्यालया च्या फॅशन टेक्नॉलॉजी विभागा तर्फे अॅक्मे फॅशन शो आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी होळी आणि रंगपंचमी या सणांवर आधारित  शेड्स ऑफ सेलीब्रेशन या संकल्पनेवर विविधरंगी पोशाख सादर केले. अॅक्मे फॅशन शो स्पर्धे मध्ये विद्यार्थ्यांनी अबीर, नीलांगना, रंगरसिया, रंगीला, व्योम, विहायसी, जलसा या सात संकल्पनांवर आधारित कॉटन, सिल्क, सिफॉन अशा कापडांपासून विविध रंगांचे अतिशय कल्पकतेने स्त्री पुरुषांचे पोशाख तयार केले होते.

प्रसिद्ध फॅशन कोरिओग्राफर चैतन्य गोखले यांनी दिग्दर्शन केले होते. फॅशन टुरिजम इंटरनॅशनल क्वीन ऑफ द ग्लोब ची विजेती  माधवी घोष, सुप्रसिद्ध छायाचित्रकार समीर बेलवलकर, ग्लॅम क्वीन व्युअर्स चॉईस विजेती नेहा तिवारी, अभिनेता योगेश पवार आणि मॉडेल रोशनी कपूर यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. विविध संकल्पनांवर आधारित या स्पर्धेमध्ये बेस्ट डिज़ाइनरचा  किताब सायली साठे हिला ‘नीलांगना’ साठी तर  नेहा काळुंखे आणि अंकिता इंगवले यांना ‘जलसा’ साठी देण्यात आला. ‘विहायसी’ या संकल्पनेस बेस्ट कलेक्शन हा किताब देण्यात आला.

या वेळी सावित्री बाई फुले विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर आणि कुलसचिव डॉ. प्रफूल्ल पवार, बी जी घोलप विद्यालयाचे  प्राचार्य डॉ. बी एन झावरे, फॅशन टेक्नॉलॉजीच्या विभाग प्रमुख दीपाली जोशी, शिक्षिका प्रीति जोशी व  अनुष्का जगदाळे, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे राजेंद्र घाडगे, अॅड. संदीप कदम, अॅड. मोहन राव देशमुख , ए.एम. जाधव इत्यादि उपस्थित होते